दिब्रेटो, खेडेकर, गुरव जेतेपदाच्या शर्यतीत
Twitter: @maharashtracity
मुंबई: किंग मास क्लासिक आयोजित परळ श्री 2023 च्या निमित्ताने नरे पार्कवर सुरू झालेल्या शरीरसौष्ठवाचा अभूतपूर्व सोहळ्यात हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या क्रीडा प्रेमींचे डोळ्याचे पारणे फेडले गेले. स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत रसेल दिब्रेटो, रोहन गुरव, सुदर्शन खेडेकर, गणेश पेडामकर, दीपक तांबिटकर, प्रतीक पांचाळसारख्या दिग्गज खेळाडूंनी आपल्या लौकिकास साजेशी पोझिंग करीत अंतिम फेरी गाठली.
शरीरसौष्ठव हा प्रचंड मेहनतीचा आणि खर्चिक खेळ आहे. यात आपलं सर्वस्व पणाला लावणाऱ्या खेळाडूंना पैसा मिळावा म्हणून मनीष आडविलकरने पुढाकार घेऊन आयोजित केलेल्या “परळ श्री” या प्रतिष्ठित स्पर्धेला तयारीत असलेल्या खेळाडूंची पिळदार देहयष्टी पाहण्याचे भाग्य क्रीडाप्रेमींना लाभले.
अवघ्या सहा गटात होत असलेल्या या स्पर्धेसाठी मुंबईतील तब्बल 105 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला होता. प्रत्येक गटात पंधरा ते वीस खेळाडू असल्यामुळे अव्वल सहा खेळाडूंची निवड करताना जजेसना अक्षरशः डोळ्यात तेल घालून परीक्षण करावे लागले.
“न भूतो न भविष्यती” असे पुरस्कार असलेल्या “परळ श्री” चे जेतेपद पटकावण्यासाठी अनेक खेळाडू सज्ज झाले असले तरी खरी लढत रसेल दिब्रेटो, सुदर्शन खेडेकर, रोहन गुरव, गणेश पेडामकर यांच्यातच होणार आहे.
विजेत्यावर रॉयल एनफिल्ड या बुलेटसह अनेक पुरस्कारांचा वर्षाव होणार आहे. स्पर्धेच्या भव्य आणि दिव्य आयोजनासाठी किंग कपिल झवेरी, स्टार कनेक्टचे दीपक चौहान, क्रीडाप्रेमी दिनेश पुजारी यांची साथ मनीष आडविलकरला लाभली. विजेत्या प्रमाणे उपविजेत्यालाही लाखमोलाचे इनाम ठेवण्यात आले आहे. यंदा महिलांची शरीरसौष्ठव स्पर्धाही होत असून विजेतीलाही लाखमोलाची बाईक दिली जाणार आहे. या स्पर्धेला महाराष्ट्रातील पिळदार सौंदर्य नरे पार्कवर अवतरले आहे.
किंग मास क्लासिक प्रेझेंट “परळ श्री 2023” अंतिम फेरीसाठी पात्र ठरलेले खेळाडू
60 किलो वजनीगट :
अजिंक्य पवार (महाराष्ट्र फिटनेस), हितेश सालप (विठ्ठल व्यायामशाळा), बबन थापा (माँसाहेब), नितीन शिगवण (फॉर्च्यून फिटनेस), प्रशांत घोलम (स्ट्रेंथ जिम).
65 किलो:
अरुण पाटील (सालम जिम), बप्पन दास (डी एन फिटनेस), गणेश पारकर (परब फिटनेस), आनंद पांडे (सालम जिम), उमेश गुप्ता (व्ही.जी.फिटनेस), साहिल खान (बॉडी वर्क).
70 किलो :
रोशन नाईक (आर एन फिटनेस), वैभव महाजन (लाईफ जिम), विशाल धावडे (बालमित्र), संदीप सावळे (डी. एन. फिटनेस), प्रतीक पांचाळ (परब फिटनेस), विनायक लोखंडे (मसल इंजिनियर).
75 किलो :
आनंदराज पिल्ले दुराई (सालम जिम), मकरंद दहिबावकर (जे 9 फिटनेस), गणेश म्हाबदी (जे9 फिटनेस), रोहन गुरव (फ्लाईंग स्कॉड), असिफ शेख (मॉर्डन फिटनेस).
80 किलो :
सतीश यादव (तळवलकर्स), आशिष लोखंडे (परब फिटनेस), गणेश पेडामकर (सर्वेश्वर फिटनेस), सुदर्शन खेडेकर, हितेश यादव, अक्षय खोत (परब फिटनेस).
80 किलोवरील :
अनिकेत पाटील (मसल क्राफ्ट), अनिकेत जाधव (डी एन फिटनेस), रसल दिब्रेटो (बॉडी वर्कशॉप), गणेश जाधव (व्ही फिटनेस), दीपक तांबीटकर (फॉर्च्यून जिम).