@maharashtracity
धुळे: धुळे महानगर खो-खो असोसिएशनच्या अध्यक्षपदी पंढरीनाथ बडगुजर तर सरचिटणीसपदी रवीकर बागुल यांची एकमताने निवड करण्यात आली.
शहरातील गरुड मैदानावर राजेंद्र महाले यांच्या अध्यक्षतेखाली धुळे जिल्हा खो-खो असोसिएशनची बैठक झाली. तालुका क्रीडा अधिकारी तथा खो-खो व कबड्डी जिल्हा क्रीडा मार्गदर्शक गुरुदत्त चव्हाण व सरचिटणीस हसमुख शहा यावेळी उपस्थितीत होते.
बैठकीत महानगर खो-खो असोसिएशनची सन २०२०-२१ ते २०२४-२५ या पाच वर्षाकरीता नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली. ती पुढीलप्रमाणे:- अध्यक्ष – पंढरीनाथ बडगुजर, उपाध्यक्ष – अशोक रेदासणी, डॉ.प्रशांत पाटील, नरेंद्र चौधरी, केयुर शहा, कार्याध्यक्ष – आनंद गिंदोडिया, खजिनदार – भरत ठाकूर, सरचिटणीस – रविकर बागुल
सह सरचिटणीस – अविनाश वाघ, भारत देसले, धर्मेंद्र पाटील, सदस्य – हेमराज ठाकूर, मनीष मासुळे, मनोहर चौधरी, महेंद्र गावडे, श्रीमती मनीषा पवार, महेंद्र वाघ यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
निवड झालेल्या सर्वांचा जिल्हाध्यक्ष राजेंद्र महाले जिल्हा सरचिटणीस हसमुख भाई शहा यांनी सत्कार केला. खो-खो खेळाचा प्रचार प्रसार व नवोदित खेळाडू कसे तयार होतील यासाठी नुतन कार्यकरणीने जिल्हाभरात मेहनत घेऊन प्रयत्न करावेत, अशी आशा जिल्हाध्यक्षांनी व्यक्त केली.