Twitter: @maharashtracity

मुंबई: पटाया (थायलँड )येथे १८-२२ ऑगस्ट या कालावधीत पार पडलेल्या ITF पटाया ओपनमध्ये भारताच्या उन्नत सांगळे आणि विश्वजीत सांगळे ह्या जोडीने स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत थायलँडच्या क्रितीकाम हनमोंत्री आणि कासिम वलईसाथेनसिल्पा ह्यांचा २-६ ६-४ १०-६ असा पराभव करत उपांत्य फेरीत मजल मारली. त्यांना जपानच्या अकिरा नाबाता आणि नाओटो तानुका या जोडीकडून ६-२ ६-० असा पराभव स्वीकारावा लागला.

मिश्र दुहेरी मध्ये भारताच्या उन्नत सांगळे आणि थायलँडच्या पेया निचाकर्ण या जोडीने स्पेनच्या जॉर्ज सोलज आणि मार्था मेसेकबॅडो ह्यांचा ४-६ ६-२ ११-९ असा विजय नोंदवत उपांत्यपूर्व फेरीत गाठली. तिथे त्याना थायलँडच्या जोडी करुन पराभव स्वीकारावा लागला.

ह्या स्पर्धेमधे वीसहून अधिक देश सहभागी झाले होते. ऑलिंपिक बीच गेममध्ये उत्तम कामगिरी करण्यासाठी उन्नत व विश्वजीत सांगळे सहभागी होणार होते, पण या स्पर्धांचे आयोजन ऐनवेळी रद्द झाले. पण पुढील आवृत्तीसाठी या आपल्या दोन्ही खेळाडूंची खेळातली कामगिरी यशस्वी वाटचालीसाठी सुरू आहे. भारताच्या या जोडीच्या स्पर्धांमधील प्रदर्शनामुळे भारताची बीच टेनिस या क्रीडा प्रकारातील आंतरराष्ट्रीय क्रमवारीत सुधारणा होणार हे निश्चित आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here