@maharashtracity
मुंबई: महाराष्ट्रातील सत्ताधारी काँग्रेस आणि विरोधी पक्ष भारतीय जनता पार्टी यांच्या आग्रहामुळे राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरातच होण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांनी कोरोनाची (corona) लाट अजूनही नियंत्रणात आली नसल्याने आणि तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून मुंबईतच (Mumbai) हे अधिवेशन व्हावे, असा आग्रह धरला होता, असे समजते.
मात्र, भाजप (BJP) आणि विदर्भातील काँग्रेस (Congress) मंत्र्यांनी नागपुरात अधिवेशन घेण्याची आग्रही मागणी केली. नागपूर अधिवेशनानिमित (Nagpur Session) होणारा खर्च वाचवून ती रक्कम विदर्भाच्या विकासासाठी (Development of Vidarbha) देण्याची तयारी अर्थमंत्री अजित पवार यांनी दर्शवली होती. मात्र, त्यासाठी भाजप आणि काँग्रेसने सकारात्मक प्रतिसाद दिला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
Also Read: भालचंद्र शिरसाट गच्छंतीप्रकरणी पालिकेचा १ कोटींचा खर्च वाया -: अनिल गलगली
मिळालेल्या माहितीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार आणि संसदीय कार्यमंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्यात आज बैठक झाली. त्यात दिनांक 20 डिसेंबरपासून नागपुरात अधिवेशन घेण्यावर दोघात एकमत झाल्याचे समजते.
यासंदर्भात वरिष्ठ सनदी अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, अधिवेशन कधी आणि कुठे घ्यायचा याचा निर्णय घेण्याचा अधिकार राज्य मंत्रीमंडळाला (cabinet) आहे. आज दोन्ही मंत्र्यांमध्ये जे काही ठरले असेल ते अनौपचारिक आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना इस्पितळातुन गुरुवारी (दिनांक 18) घरी पाठवले जाणार आहे. येत्या काही दिवसात ते ऑनलाइन पद्धतीने प्रत्यक्ष कामात सहभागी होतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
तसे झाल्यास पुढील आठवडयात बुधवार दिनांक 24 रोजी मंत्रिमंडळ बैठकीत अधिवेशन आणि त्याचे स्थळ याबाबत निर्णय घेतला जाईल आणि या निर्णयावर विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीत (BAC) शिक्कामोर्तब केले जाईल, अशी शक्यता आहे.
त्याच बैठकीत दिनांक 20 डिसेंबरपासून नागपुरात अधिवेशन घेण्याचा निर्णय घेतला जाईल अशी शक्यता आहे. दिनांक 25 पासुन ख्रिसमस सुरू होत आहे. त्यामुळे, दिनांक 20 ते 24 असे पाच दिवासासाठी नागपुरात अधिवेशन भरवले जाईल अशी शक्यता आहे.
दरम्यान, विधानभवन कर्मचाऱ्यांना नागपुरात अधिवेशन असेल असे समजून तयारीला लागा अशा सूचना देण्यात आल्या आहेत.