@maharashtracity

मुंबई: शिवसेना नेते आणि राज्यसभा सदस्य संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या आवाहनाला नवाब मलिक यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे समजते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (LoP Devendra Fadnavis) यांनी पुन्हा काही आरोप केले नाही तर सध्या मलिक आणि फडणवीस यांच्यात सुरू असलेला कलगीतुरा थांबण्याची चिन्हे आहेत.

दिल्लीत बोलताना संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्राची ही संस्कृती नाही. आता जी चिखलफेक सुरू आहे ती थांबायला हवी. यासाठी वरिष्ठांनी लक्ष घालायला हवे.

राऊत पुढे म्हणाले की, नवाब मलिक (Nawab Malik) हे वरिष्ठ मंत्री आहेत. त्यांच्या कुटुंबाला जे भोगावे लागले त्याच्या संतापातून ते व्यक्त झाले.

Also Read: मुंबईत 9 वॉर्ड वाढले

मिळालेल्या महितीनुसार राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी नवाब मलिक यांचे कौतुक केले. नवाब मलिक यांनी जोरकसपणे खिंड लढवल्याबद्दल त्यांचे कौतुक करण्यात आले.

त्याचवेळी संजय राऊत म्हणतात तसे आता हे प्रकरण थांबवावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

सूत्राने दिलेल्या माहितीनुसार नवाब मलिक यांनी सकारात्मक प्रतिसाद देतांना सांगितले की समोरून माझ्यावर पुन्हा काही आरोप झाले नाहीत तर मी थांबायला तयार आहे.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी आज केलेल्या वादग्रस्त ट्विट मुळे ही चिखलफेक थांबेल असे वाटत नाही, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली गेली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here