उपसभापती निलम गोऱ्हे यांनी गुलाबराव पाटीलांना झापले
@maharashtracity
मुंबई: विधानपरिषदेत शिक्षकांच्या निधीवरुन चर्चा सुरु होती. शिक्षक आमदार विक्रम काळे यावर प्रश्न विचारत प्रस्ताव करत होते. दरम्यानच्या काळात गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांचे खाली बसून बोलणे सुरु होते. उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी त्यांना बोलायची संधी दिल्यावर त्यांनी आक्रमक भाषेत म्हणणे मांडण्यास सुरुवात केली. हा आक्रमक आवेश पाहून सभागृहात बोलायची ही पद्धत नसल्याचे गोऱ्हे यांनी पाटील यांना समज दिली.
यावर मात्र मी मंत्री असल्याचे पाटील म्हणाले. यावर गोऱ्हे (Dr Neelam Gorhe) वैतागून म्हणाल्या की, मंत्री असाल तर तुमच्या घरी. वाद वाढू नये यासाठी इतर सदस्यांना मध्यस्थी करावी लागल्याचे चित्र आज विधान परिषदेत (Upper House) दिसून आले.
गुलाबराव पाटील यांना उपसभापती नीलम गोऱ्हे यांचे बोलणे ऐकावे लागले. शिक्षकांच्या प्रश्नावर चर्चा सुरु असताना गुलाबराव पाटील खाली बसून बोलत असल्याचे दिसून आले. त्यामुळे उपसभापतींनी त्यांना बोलण्यास संधी दिली. मात्र यावेळी पाटील यांचा आवेश अधिक आक्रमक असल्याचे दिसून आला. परिषदेत भाषण करत असताना पाटील यांनी उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडे हातवारे केल्याने त्या संतापल्या. अखेर गोऱ्हे यांनी उपसभापती या भुमिकेतून तुम्ही आताच्या आता खाली बसा. तुमची ही बोलायची पद्धत आहे का? छाती ठोकून विधान परिषदेत का बोलता, असे विचारले. प्रत्युत्तर देतांना मंत्री पाटील म्हणाले, मी बोलणारच. मी मंत्री आहे.
त्याच क्षणी उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी तडकाफडकी उत्तर देत ’मंत्री असाल तुमच्या घरी….‘ असे म्हणत त्यांना झापले. शिक्षकांच्या निधीचा प्रश्न असल्याने शिक्षक आमदार विक्रम काळे यावर बेलत होते. यावर दीपक केसरकर बोलणे अपेक्षित असल्याने चर्चा सुरु झाली.