@maharashtracity

धुळे: तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) हे बदल्यांची यादी पाठवायचे या तत्कालीन गृह सचिव सिताराम कुुंटेंच्या (Sitaram Kunte) जबाबातून गृहमंत्री बदल्यांमध्ये हस्तक्षेप करायचे हे स्पष्ट झाले आहे. पोलिसांच्या बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला असल्याचा आमच्या आरोपातील सत्य समोर आले आहे. असे सांगून राज्यातील महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi) हे महावसूली सरकार असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (LoP Pravin Darekar) यांनी केला आहे. 

दरेकर हे शनिवारी धुळे (Dhule) दौर्‍यावर आले होते. पत्रकार परिषदेत बोलताना दरेकर म्हणाले की, बदल्यांसाठी या सरकारने करोडो रुपये लाटले. सचिन वाझेनेही (Sachin Waze) वसूलीचे आरोप केले, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

“पैसे घेऊन पोलीस अधिकार्‍यांच्या चांगल्या ठिकाणी बदल्या झाल्या आहेत. यातून कर्तबगार अधिकार्‍यांवर अन्याय झाला आहे. पुढे अनैतिक गोष्टी वाढल्या. दिलेले पैसे वसूलीसाठी त्यांना त्रास झाला. पोलिसांच्या बाबतीत संशय निर्माण होतो. त्यावेळेला कायदा व सुव्यवस्थेची (Law & order) समस्या निर्माण होते,” असा दावा दरेकर यांनी केला. उशीरा को होईना सत्य पुढे आले, असे प्रवीण दरेकर म्हणाले.

भाजप कार्यकर्त्यांना गोवले

साक्रीमधील महिलेच्या खूनाबाबत दरेकर म्हणाले, भाजपाच्या कार्यकर्त्यांना (BJP workers) यात विनाकारण अडकविले जात आहे. यासंदर्भात आपण अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांची भेट घेतली. या प्रकरणात राजकारण करुन भाजप कार्यकर्त्यांना गोवले जात असून पोलिसांनी पारदर्शी तपास करावा, अशी त्यांनी मागणी केली.

साक्रीमध्ये भाजपचा विजय (BJP won Sakri Nagar Panchayat) झाल्याने राज्यातील आघाडी सरकारला पोटदुखी झाली आहे. यामुळे भाजप कार्यकर्त्यांविरुध्द खोटे गुन्हे दाखल केले जात आहे. याबद्दल आपण सीबीआय चौकशीची (CBI probe) मागणी करणार असून न्यायालयातही दाद मागणार आहोत, असे दरेकर यांनी सांगितले.

कारखानदारांचेच हित

शेतकर्‍यांच्या आडून राज्यात किराणा दुकानांवर वाईन विक्रीचा (wine at Super Market) महाविकास आघाडी सरकारने (MVA) घाट घातला आहे. एवढीच शेतकर्‍यांची चिंता आहे तर अतिवृष्टीची भरपाई (compensation to farmers) शेतकर्‍यांना का दिली जात नाही? शेतकर्‍यांचा कळवळा हे केवळ थोतांड आहे. महसूल वाढीच्या नावाखाली सरकार मद्यनिर्मीती करणार्‍या कारखानदारांचे हित जोपासत आहे, असा आरोप करून किराणा दुकानात वाईन विक्रीच्या निर्णयाचा दरेकरांनी धिक्कार केला.

निधी खर्चावरुन चूकीचे राजकारण

आदिवासींच्या विकासासाठीचा (Tribal department) निधी शंभर टक्के खर्च झाला पाहीजे. आदिवासींचाच नाहीतर केंद्राकडून येणारा कुठलाही निधी राज्याकडून वापरला जात नाही. तो वापरला गेला तर त्याचे श्रेय केंद्राला जाईल, यामुळेच तो वापरला जात नाही. श्रेयाच्या नादात एखाद्या आदिवासीचा जीव गेला तरी चालेल, त्यांना सुविधा नाही मिळाल्या तरी चालेल, पण श्रेय केंद्राला जायला नको, असे चूकीचे राजकारण महाविकास आघाडी सरकार करीत आहे. आमच्या खासदार हिना गावीत (BJP MP Heena Gavit) यांनी केंद्राचा निधी का खर्च झाला नाही, याबाबत खुलासा मागितला आहे, अशी माहिती दरेकर यांनी दिली.

राऊतांनी पूलच बंद केला

राज्यातील भाजप आणि शिवसेनेमधील दरी वाढत असल्याच्या प्रश्‍नाला उत्तर देताना विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले की, शिवसेनेचे खा. संजय राऊत (Shiv Sena MP Dr Heena Gavit) यांनी भाजपा-शिवसेनेमधील दरी केवळ वाढविली नाही तर त्यांनी मधला पुलच बंद केला आहे. शिवाय, आमच्यावर पाळत ठेवली जात आहे, आमची बँक खाती तपासली जात आहे, हे राऊत यांनी केलेले आरोप बिनबुडाचे आहेत.

तसे असेल तर त्यांनी पुरावे द्यावेत. जे राज्याचे मूळ प्रश्‍न आहे त्यांना आघाडी सरकारकडून उत्तरे दिली जात नाही. अवांतर काहीतरी बोलले जाते. मूळ प्रश्‍नांना बगल दिली जाते. सध्या बेताल वक्तव्य करण्याची जणू काही महाविकास आघाडीमध्ये स्पर्धा लागली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here