@maharashtracity
राष्ट्रवादीचे ’जबाब दो’ आंदोलन
कामे तत्काळ करण्याची मागणी
धुळे: महाविकास आघाडीकडून (MVA) कोट्यावधी रुपयांचा निधी मिळूनही कामे अपूर्णच राहील्याने शहरातील रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. ठेकेदारांच्या मिलीभगतमुळे रस्त्यांची कामे अपुर्णच राहीली आहेत. निधी मिळूनही कामे होत नसल्याने सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) पदाधिकार्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांच्या दालनात ठिय्या मांडून ’जबाब दो’ आंदोलन केले. (NCP staged protest in the office of PWD engineer)
या आंदोलनात राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष रणजीत भोसले, जितेंद्र पाटील, राजेंद्र चौधरी, दीपक देसले, महेंद्र शिरसाठ, राजेंद्र डोमाळे, मंगेश जगताप, असलम खाटीक, सचिन देवरे, कृष्णा गवळी आदी कार्यकर्त सहभागी झाले होते.
रणजीत भोसले यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, काही दिवसांपूर्वी राज्याचे बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भारणे (MoS Dattatray Bharane) यांनी धुळे शहरातील 100 कोटी रुपयांच्या निधीतील रस्त्यांबाबत मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक घेतली होती.
त्या बैठकीमध्ये मनपा आयुक्त, अभियंता, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, उपअभियंता, सचिव, मंत्रालयीन अधिकारी आदी उपस्थित होते.
त्या बैठकीमध्ये शहरातील रस्त्यांचे काम दोन महिन्यात पूर्ण करण्याचे आदेश ना.भरणे यांनी दिले होते. परंतु दोन महिने उलटूनही मनपा (DMC) व बांधकाम विभाग (PWD), ठेकेदार (Contractor) यांनी काम पूर्ण केले नाही.
त्यामुळे ठेकेदारांना नोटीस दिली का? मंत्री महोदयांच्या आदेशाचे काय झाले? काम का थांबले? याबाबत प्रश्न उपस्थित करुन राष्ट्रवादीने कार्यकारी अभियंत्याच्या दालनात ठिय्या मांडला.
तसेच मनपा, बांधकाम विभागातील ठेकेदारांच्या मनमानीमुळे रस्त्यांची कामे अपूर्ण राहील आहेत, कामात अनियमीतता आणि भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही राष्ट्रवादीने केला आहे. याबाबत उत्तरे द्यावीत, तसेच लवकरात लवकर रस्त्यांची कामे पुर्ण करावीत, अशी मागणी राष्ट्रवादीने यावेळी केली.
त्यावर कार्यकारी अभियंता श्रीमती घुगरी यांनीे ठेकेदारांना नोटिसा बजावण्याचे आदेश देत, येत्या 10 तारखेनंतर कामाला सुरूवात करणार असल्याचे आश्वासन राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांना दिलेत.