uddhav

शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांचा शिल्लक सेनेवर हल्लाबोल

@maharashtracity

मुंबई: जातपातीचं राजकारण करून समाजात तेढ निर्माण करणाऱ्या संभाजी ब्रिगेडसोबत शिल्लक सेनेने केलेली युती ही सर्वसामान्य शिवसैनिकासाठी अत्यंत वेदनादायक असल्याचे मत शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) यांनी व्यक्त केले आहे. संभाजी ब्रिगेड ही नक्की कुणाची बी टीम आहे हे माहीत असूनही ही युती करणे अनाकलनीय असल्याचं मत त्यांनी व्यक्त केले आहे.

ज्या विचारामधून संभाजी ब्रिगेडचा (Sambhaji Brigade) जन्म झाला आणि ज्यांच्या पाठबळावर ही संघटना विस्तारली त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत (NCP) त्यांनी युती करायला हवी होती. मात्र, तसे न करता त्यांनी शिल्लक सेनेसोबत (Shiv Sena) जाण्याचा घेतलेला निर्णय हा नक्की कुणाच्या सांगण्यावरून घेतला असेल हे संपूर्ण महाराष्ट्र जाणतो असे त्या म्हणाल्या.

संभाजी ब्रिगेडसोबत युती करून प्रबोधनकार ठाकरे (Prabodhankar Thackeray) आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची जात पात विरहित राजकारण करण्याच्या परंपरेला छेद देण्याचा केलेला प्रयत्न सर्वसामान्य शिवसैनिकाला निश्चितच पटला नसेल असेही शीतल म्हात्रे म्हणाल्या. युती सरकार सत्तेत असताना स्वर्गीय बाबासाहेब पुरंदरे (Babasaheb Purandare) यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याविरोधात ज्या ब्रिगेडने उच्च न्यायालयात धाव घेतली त्यांना सोबत घेण्याचा शिल्लक सेनेचा निर्णय निश्चितच भूषणावह नाही, असे मतही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here