By Anant Nalavade

Twitter : @nalavadeanant

मुंबई: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना जीवे मारण्याच्या आलेल्या धमकीनंतर राज्यभरात खळबळ उडाली असतानाच खुद्द पवार यांनी यावर प्रतिक्रिया देत मी असल्या धमकीची चिंता करत नाही, धमक्यांना घाबरत नाही. ज्यांच्याकडे जबाबदारीची ही सूत्रं आहेत, त्यांना जबाबदारी टाळता येणार नाही,’ अशी शब्दात प्रतिक्रिया दिली.

कोणत्याही घटनेवर मत मांडण्याचा देशाच्या प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे. धमक्या देऊन जर कोणाचा आवाज बंद करू शकेल असे कोणाला जर वाटत असेल तर तो त्यांचा गैरसमज आहे. आपल्याला धमकीची चिंता नाही, आपला राज्यातील पोलीसांवर विश्वास आहे, असेही पवार यांनी नमूद केले.

शरद पवार यांना समाज माध्यमावर तुमचा नरेंद्र दाभोळकर करू अशी धमकी आली आहे. त्यावर पवार प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की राज्याची कायदा आणि व्यवस्थेची जबाबदारी ज्यांच्याकडे आहे त्यांनी यासंबंधी काळजी घ्यावी. राज्याची कायदा आणि सुव्यवस्था राखणे याची जबाबदारी राज्य सरकारवर आहे. पोलिस दलावर आपला पूर्ण विश्वास आहे आणि धमकीची चिंता मी करत नाही असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here