@maharashtracity

नवी दिल्ली: रत्नागिरी जिल्ह्यातील भाजप नेते संतोष गांगण यांची केंद्रीय ग्रामीण मंत्रालयाच्या दिशा (DISHA) या अत्यंत महत्वाच्या राज्यस्तरीय समितीच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

भाजपचे राज्यसभा सदस्य डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी तात्कालीन केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री नरेंद्र सिंग तोमर (Narendra Singh Tomar) यांच्याकडे संतोष गांगण यांच्या नावाची शिफारस केली होती.

या प्रस्तावाची केंद्रीय ग्रामीण मंत्रालयाच्या विविध विभागातून छाननी झाल्यानंतर केंद्रीय गामीण विकास मंत्री गिरीराज सिंह यांनी गांगण यांची महाराष्ट्र राज्यस्तरीय ‘दिशा’ (DISHA) समितीच्या सदस्यपदी नियुक्ती केली.

या राज्यस्तरीय समितीचे अध्यक्ष राज्याचे मुख्यमंत्री असतात तर ग्रामविकास मंत्री उपाध्यक्ष असतात. प्रत्येक राजकीय पक्षाचा एक लोकसभा सदस्य, राज्यसभा सदस्य, विधानसभा सदस्य व अशासकीय सदस्य अशी समितीची रचना असतें. त्यात अशासकीय सदस्य म्हणून गांगण यांची नियुक्ती झाली असून राज्यात ‘अ’ वर्ग अधिकारी दर्जाचा प्रोटोकॉल असणार आहे.

गांगण म्हणाले, सर्वांगीण दृष्टीकोन स्वीकारून शाश्वत, एकात्मिक आणि वेगवान ग्रामीण विकासासाठी समान उद्दिष्ट असलेल्या केंद्राच्या विविध मंत्रालयांच्या विविध कार्यक्रमांच्या तथा योजनांच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवण्यासाठी ही समिती काम करेल.

संसद (Parliament), राज्य विधीमंडळ (State legislature) आणि स्थानिक स्वराज्य संस्था (पंचायती राज संस्था/नगरपालिका संस्था) मध्ये सर्व निवडून आलेले लोकप्रतिनिधी यांच्यात कार्यक्षम आणि उत्तम समन्वय सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने जिल्हा विकास समन्वय आणि संनियंत्रण समिती (दिशा) ची २७ जून २०१६ ला केंद्र सरकारने स्थापना केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना अभिप्रेत असलेल्या सुशासनाच्या दृष्टीने देशातील प्रत्येक गावाच्या विकासात्मक कार्यक्रमांचे (development work of villages) प्रभावीपणे निरीक्षण करण्यास आणि नियोजन स्तरावर योग्य सुधारणांसाठी फीडबॅक देण्यासाठी समिती ही सक्षम असते, असे गांगण म्हणाले.

गांगण पुढे म्हणाले की, केंद्र सरकारचे कार्यक्रम, योजना कार्यक्षम आणि पारदर्शकरीतीने कार्यान्वित केल्या जातील आणि गरीबांपर्यंत विनाअडथळा लाभ पोहोचतील याची खात्री करण्यासाठी सदस्याची महत्त्वपूर्ण देखरेखीची भूमिका असते.

केंद्र सरकारच्या विविध २३ मंत्रालयांच्या प्रधानमंत्री ग्राम सडक योजना (PMGSY), प्रधानमंत्री आवास योजना (PMAY), राष्ट्रीय कृषी विकास योजना (RKVY), प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना (PMUY), संसद सदस्य स्थानिक क्षेत्र विकास योजना (MP-LAD), प्रधानमंत्री कौशल विकास योजना (PMKVY), राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), सर्व शिक्षा अभियान (SSA), डिजिटल इंडिया (Digital India), स्वच्छ भारत मिशन (Swach Bharat Mission), प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजना (PMAGY), स्मार्ट सिटी मिशन (Smart City Mission), दीनदयाळ अंत्योदय योजना (NRLM), महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार
हमी (MahaEGS) अश्या विविध ४३ योजना तथा कार्यक्रमांचा समावेश या समिती अंतर्गत होतो.

योजना तथा कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी, निरक्षण दक्षता व सुधारणाविषयी राज्यातील संबंधित अधिकाऱ्यांशी बैठक करणे हे या समिती सदस्याचे मुख्य काम आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या दिशा समितीच्या बैठकीत सहभागी होऊन केंद्र सरकारच्या राज्यात राबविल्या जाणाऱ्या योजनांची वस्तुस्थिती मांडता येते आणि त्यातून जनहिताचे प्रभावी निर्णय घेता येतात, असे ही संतोष गांगण म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here