By Sadanand Khopkar

Twitter: @maharashtracity

मुंबई: अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी कांद्याला भाव मिळत नसल्याचा मुद्दा गाजला. सरकार शेतकऱ्यांसोबत आहे, या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आश्वासनानंतरही विरोधी पक्षांचे समाधान झाले नाही. कांदा खरेदी विषयावरून विरोधी सदस्यांनी प्रचंड गदारोळ केला.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी स्थगन प्रस्तावाद्वारे हा प्रश्न उपस्थित केला. कांदा खरेदी होत नाही. योग्य बाजारभाव नाही याकडे पवार यांनी लक्ष वेधले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य छगन भुजबळ, नाशिक येथील भाजप सदस्य राहुल अहेर, काँग्रेसचे नाना पटोले यांनी कांदा खरेदीविषयी विविध प्रश्न उपस्थित केले. छगन भुजबळ यांनी नाफेडने शेतकर्‍यांच्या कांद्याची खरेदी करावी, अशी मागणी केली.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही या प्रश्नांची गंभीर नोंद घेण्याचे निर्देश दिले. या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना शेतकर्‍यांच्या प्रश्नावर मार्ग काढायचा आहे की, राजकारण करायचे आहे? असा प्रश्न विचारला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सरकार शेतकर्‍यांच्या समवेत आहे, शेतकर्‍यांना आवश्यक ते सर्व साहाय्य करण्यात येत आहे, नाफेडने खरेदी चालू केली आहे, आतापर्यंत २.३८ मेट्रीक टन इतक्या कांद्याची खरेदी झाली आहे, असे उत्तर दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here