@maharashtracity

हिंगोली: हिंगोली जिल्ह्यातील काळेगाव येथे आजच्या पदयात्रा चौक सभेत हजारो लोकांना संबोधित करताना राहुल गांधी यांनी भाजपा (BJP), आरएसएस (RSS), मोदी सरकारचा (Modi Government) अणि त्यांच्या धोरणाचा खरपूस समाचार घेतला. 

ते म्हणाले की, चीनमधून (China) वस्तू आयात केल्या जातात यातून चीनचा फायदा होतो आणि हे माल विकणारे काही उद्योगपती गडगंज होत आहेत. हे मोफाईल व इतर वस्तू ‘मेड इन चीन, नाही तर मेड इन हिंगोली’ (Made in Hingoli) अशा झाल्या पाहिजेत.

ते म्हणाले की, भाजपाच्या राज्यात पेट्रोल, डिझेल, गॅसच्या किमती कमी होत नाहीत. यातून मिळालेला पैसा दोन चार उद्योगपतींच्या (capitalist) खिशात जातो. छोटे व्यापारी यांचे नुकसान झाले. हा व्यवसायच बंद करून दोन चार उद्योगपतींची (Industrialist) एकाधिकारशाही आणण्याचा मोदींचा मनसुबा आहे. हे सरकार ‘हम दो हमारे दो’ चे आहे असे राहुल गांधी यांनी म्हणताच जनतेतून याला प्रतिसाद देत, ‘दो सरकार में, दो बाजार में’, असा आवाज उमटला.

गांधी म्हणाले, शेतकरी पहाटे 4 वाजता कामाला सुरूवात करतो. घाम गाळतो. पण शेतमालाला भाव मिळत नाहीत. पीक विम्यासाठी (crop insurance) खाजगी कंपन्यांना हप्ता भरतात. चक्रीवादळ, पाऊस, अतिवृष्टीने पिकांचे नुकसान होते. पण नुकसान भरपाई मिळत नाही. मोदी सरकार देशातील उद्योगपतींचे कर्ज दोन मिनिटात माफ करतात, पण शेतकऱ्याला कर्जमाफी (loan waiver to farmers) देत नाहीत, असा घणाघाती हल्लाबोल खा. राहुल गांधी यांनी केला.

लष्कर, बीएसएफ, सीआरपीएफमधील तरुण देशासाठी मरण्यास तयार असतात. पण येथेही मोदींनी अग्निपथ योजना (Agnipath Scheme) आणली. जवानांना (Army Jawan) उत्तम प्रशिक्षण दिले पाहिजे, पण मोदी सरकार फक्त सहा महिन्यांचे प्रशिक्षण देत आहे. हे जवान आव्हानाला कसे सामोरे जाणार ? असा प्रश्र्न उपस्थित करून राहुल गांधी म्हणाले, जवानांना सेवेनंतर गावात सन्मान मिळत होता. 15-20 वर्ष देशासाठी दिल्यामुळे हा सन्मान मिळत असे. पण अग्निपथमुळे सैन्यच कमजोर होईल. आता त्यांना या सेवेतही स्थैर्य नाही, चार वर्षानंतर घरी जा, अशी ही योजना आहे, यातून बेरोजगारी वाढवण्याचे काम होणार आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here