@maharashtracity

वकिलाची कोर्टात माहिती

खडसे गैरहजेरीसाठी खोट बोलतात- अंजली दमानिया यांचा आरोप

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात दाखल असून त्यांच्यावर गंभीर शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती खडसे यांच्या वकिलांनी कोर्टात दिली. (NCP leader Eknath Khadse is admitted in Bombay Hospital)

मुंबई सेशन कोर्टात एकनाथ खडसे अनुपस्थित राहिल्याने खडसेंच्या वकिलांनी कोर्टात ही माहिती दिली. मात्र, कोर्टात दिलेल्या या माहितीवरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी खडसे खोटं बोलून गैरहजर राहिल्याचा आरोप केला आहे. (Social activist Anjali Damania alleges Khadse over his absent in court)

खडसे यांच्यावर भोसरी भूखंड प्रकरणात ईडी चौकशी सुरु असून या प्रकरणी मुंबई सेशन कोर्टात ते अनुपस्थित राहिले. (khadse is facing probe by ED) त्याचे स्पष्टीकरण देताना वकिलांनी खडसे आजारी असल्याचे सांगत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे सांगितले.

शिवाय त्यांच्यावर गंभीर शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे वकिलांनी माहिती दिली. दरम्यान खडेंना ईडीने समन्स जारी करत चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते.

खडसे खोटे बोलत आहेत : अंजली दमानिया

खडसे याना बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र ते खोटं बोलत असल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे. एकनाथ खडसे यांना युपर्वीही रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आठवडाभरापासून बॉम्बे रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांना मूत्रमार्गाचा संसर्ग झाल्याने रुग्णालयात दाखल करावे लागले होते.

भोसरी प्रकरणाला उकळी :

ईडीने समन्स दाखल केल्याने हे प्रकरण पुन्हा एकदा पेटले आहे.

पुण्यातील भोसरी भूखंड एकनाथ खडसे महसूल मंत्री असताना खरेदी केला. पत्नी मंदाकिनी खडसे आणि त्यांचे जावई गिरीश चौधरी यांनी ३ कोटी ७५ लाख रुपयांना खरेदी केली होती. सर्वे क्रमांक ५२ मधील ३ एकर जागा त्यांनी खरेदी केली. एकनाथ खडसे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करुन जमीन खरेदी केली असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला यामुळे त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here