मुंबई: कोरेगाव भीमा येथील दंगल ही सुनियोजित होती ही आमच्या पक्षाची पहिल्यापासून भूमिका आहे त्यामुळे यापूर्वीच पवारसाहेबांनी आपल्या लेखी प्रतिज्ञा पत्राच्या माध्यमातून म्हणणे दिले आहे. शिवाय चौकशी आयोगाने पवारसाहेबांकडे वेळ मागितली होती. त्यानुसार येत्या ४ एप्रिलला शरद पवार हे आयोगासमोर येऊन साक्ष देतील अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक पत्रकार यांनी परिषदेत दिली.

मागील मुख्यमंत्र्यांना साक्ष देण्यासाठी बोलावण्यात आले होते परंतु त्यांनी चौकशी आयोगाला सहकार्य केलेले नाही. लेखी प्रतिज्ञा पत्राच्या माध्यमातून तसे कळवलेही नाही असेही नवाब मलिक म्हणाले.

चौकशी आयोगाकडून जे काही सत्य समोर येईल ते जनतेला कळेलच असे सांगतानाच संसदेचे अधिवेशन असल्याने पवारसाहेब हे दिनांक ४ एप्रिल रोजी चौकशी आयोगासमोर जाणार आहेत. राज्य चौकशी आयोगाची मुदत ही ८ तारखेला संपणार असली तरी इतर आयोगाप्रमाणे त्यालाही सरकारकडून मुदतवाढ दिली जाईल असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here