@maharashtracity

मुंबई: पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंतीदिनी आयोजित कार्यक्रमाच्यावेळी चौंडीत पडळकर आणि सदाभाऊ खोत यांचा ताफा पोलिसांनी अडवला. त्यामुळे काहीसा वादाचा प्रसंग उद्भवला होता.

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंतीदिनानिमित्त राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे मंगळवारी चौंडीमध्ये होते. भारतीय जनता पक्षाचे विधान परिषद सदस्य गोपीचंद पडळकर हे देखिल मंगळवारी चौंडीत होते. याठिकाणी वाद होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. अखेर वादाची ठिणगी पडली.

अहमदनगरच्या चौंडीत पडळकर आणि सदाभाऊ खोत यांचा ताफा पोलिसांनी अडवला. त्यामुळे वाद पाहायला मिळाला. नाशिकच्या शास्त्रार्थ सभा सुरु होण्याआधीच वाद निर्माण झाला. बसण्यावरुन हा वाद निर्माण झाल्याने येथे गोंधळ पाहायला मिळाला. पोलिसांनी आमच्यावर बळाचा वापर केल्याचा आरोप पडळकर आणि खोत यांनी केला आहे.

चौंडीत जाण्यापासून पडळकर आणि खोत यांना रोखल्याने कार्यकर्ते संतप्त झालेत. त्यांनी घोषणाबाजी सुरु केली. दरम्यान, सदाभाऊ खोत आणि पोलिसांमध्ये बाचाबाची पाहायला मिळाली. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती सोहळ्याला जाताना आमची अडवणूक का, असा सवाल पडळकर यांनी उपस्थित केला. आम्ही यात्रेवर ठाम आहे, असे गोपीचंद पडळकर म्हणालेत. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीला आव्हान दिले. पवारांनी समोरासमोर सभा लावावी असे सांगत शरद पवार यांचे हे कुठलं पुरोगामित्व, असे पडळकर म्हणाले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची मंगळवारी 297 वी जयंती नगरमधील चौंडी इथं साजरी करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत हा जन्मोत्सव सोहळा पार पडला. कर्जत- जामखेड मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केले आहे.

दुसरीकडे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या अहिल्यादेवी जागर यात्रेचा समारोपही मंगळवारी चौंडीत करण्यात आला. या दोन्ही कार्यक्रमासाठी दोन्ही पक्षांचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येनं जमा होऊ लागलेत. मात्र या दरम्यान भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये राजकीय वाद उफाळल्याचं दिसून आले. माजी मंत्री राम शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर गंभीर आरोप करत हा जयंती सोहळा नसून राष्ट्रवादीचा मेळावा आहे, अशी टीका केली.

तर 1993 च्या बॉम्बस्फोटात सहभाग असणाऱ्या आणि शेकडो हिंदूंचा खून करणारे आज सत्तेत बसलेत. त्या भ्रष्टाचारी आणि जातीयवादी लोकांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचं अनावरण केलं होते. त्या जातीयवादी लोकांचे हात अहिल्यादेवी होळकरांच्या पुतळ्याला लागले होते. त्यामुळे आज अहिल्यादेवींच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करुन त्याचं शुद्धीकरण करणार असल्याचं पडलकरांनी म्हटले आहे.

शरद पवारांवर टीका करताना पडळकर पुढे म्हणाले की शरद पवारांवर या वयात आपण हिंदू आहोत हे सांगण्याची ही वेळ आली आहे. मी हुनमान मंदिरात जाऊन माझ्या प्रचाराचा नारळ फोडतो हे सांगण्याची वेळ आता त्यांच्यावर आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here