विरोधकांनी घेतली राज्यपालांची भेट
Twitter :@NalavadeAnant
मुंबई
पाशवी बहुमताच्या बळावर विधान परिषदेचे कामकाज चालू देणार नाही, अशी भूमिका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सोमवारी येथे व्यक्त केली. महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांनी विधानसभेचे कामकाज स्थगित झाल्यानंतर राज्यपालांचीही भेट घेतली. राज्यपालांनी या संदर्भात सकारात्मक चर्चा केली असून आम्ही त्यांच्या निर्णयाची प्रतिक्षा करत आहोत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
पत्रकारांशी बोलतांना दानवे म्हणाले की, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांना पदावर रहाण्याचा अधिकार नाही. त्यांना तात्काळ दूर करण्याची मागणी आम्ही राज्यपालांकडे केली आहे. या आधीही गोर्हे यांच्यावर भाजपने अविश्वास प्रस्ताव दिलेला आहे. आता आम्हीही तसा प्रस्ताव दिलेला आहे. त्यामुळे त्यांना या पदावर काम करण्याचा नैतिक अधिकार नाही.