Twitter: @maharashtracity
मुंबई: जैन धर्माचे 20 तीर्थंकर श्री सम्मेद शिखरजी ज्या भूमीत मोक्ष गेले ते स्थळ झारखंड राज्य सरकारने पर्यटन स्थळ म्हणून जाहीर केले आहे. सम्मेद शिखरजी हा केवळ एक जमिनीचा तुकडा नाही तर ते एक शाश्वत तिर्थ आहे. त्या ठिकाणच्या कणाकणात पवित्रता आहे, त्या ठिकाणच्या भूमीचे पर्यटन स्थळात रूपांतर करणे म्हणजे तिची पवित्रता नष्ट करणे होय, असे मत भाजपा भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक तथा माजी आमदार नरेंद्र पवार यांनी व्यक्त केले आहे.
दरम्यान, या स्थळाची पवित्रता कायम राखण्यासाठी या स्थळाला देण्यात आलेला प्रयत्न स्थळाचा दर्जा रद्द करण्यासाठी झारखंड सरकारवर दबाव आणावा अणि त्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी नरेंद्र पवार यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.