@maharashtracity

मुंबई: जनकल्याण सहकारी बँकेच्या संचालकपदी कल्याण पश्चिम येथील माजी आमदार तथा भाजपा भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक नरेंद्र पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे. सन 2022 ते 2027 या पंचवार्षिक वर्षांसाठी त्यांची निवड झाली आहे. नरेंद्र पवार हे या अगोदरही जनकल्याण बँकेच्या संचालक पदावर होते, त्यांची ही तिसऱ्यांदा निवड झाली आहे.

जनकल्याण सहकारी बँक (Jankalyan Shakari Bank) ही सहकार क्षेत्रात अग्रगण्य असलेली संस्था आहे. गेल्या 46 वर्षांपासून मुंबई, ठाणे व रायगड जिल्ह्यात काम करणारी ही बँक आहे. गेल्या 46 वर्षांपासून सुरू असलेल्या या बँकेत आज 2130 कोटींच्या ठेवी आहेत, तर 972 कोटी रुपये कर्ज वाटपाची रक्कम आहे. 

बँकेचे एकूण 62 हजार सभासद आहेत. त्या सभासदांच्या विश्वासाच्या बळावर बँकेने मोठा पल्ला गाठला आहे. सामाजिक व राजकीय क्षेत्रात अत्यंत अभ्यासू आणि प्रामाणिकपणे काम करणारे नरेंद्र पवार (Narendra Pawar) जनकल्याण सहकारी बँकेच्या संचालकपदाच्या माध्यमातून सहकार क्षेत्रातही अत्यंत अभ्यासूपणे काम करत आहेत. त्यांची निवड झाल्यानंतर सामाजिक, राजकीय व सहकार क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here