माजी आमदार नरेंद्र पवार यांनी कडोंमपाचे शिक्षणाधिकारी विजय सरकटे यांची भेट घेऊन केली मागणी

@maharashtracity

कल्याण: कल्याण डोंबिवली महानगरपालिका (KDMC) क्षेत्रात असलेल्या टिटवाळा (Titwala) येथील ठाकूरपाडा आदिवासी शाळा क्रमांक 5 चे छत मोठ्या प्रमाणात गळत आहे. सध्या पावसाळा सुरू असल्याने विद्यार्थ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. त्यांची गैरसोय होते, त्याची गंभीर दखल घेत भारतीय जनता पार्टी (BJP) भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक तथा माजी आमदार नरेंद्र पवार (Narendra Pawar) यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी विजय सरकटे यांची भेट घेत तातडीने छत दुरुस्ती करण्याची मागणी केली.

त्या संदर्भात शिक्षणाधिकारी सरकटे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, प्रशासकीय मान्यतेसाठी त्या छत दुरुस्तीचा प्रस्ताव ठेवला आहे, मान्यता मिळाल्यावर तातडीने त्याची दुरुस्ती केली जाईल, कोणत्याही विद्यार्थ्यांना त्याचा त्रास होऊ नये व त्याचा परिणाम शिक्षणावर होऊ नये याची काळजी घेऊ, अशी ग्वाही दिली.

यावेळी माजी उपमहापौर बुधाराम सरनोबत व आदी पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here