काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा दावा

By सदानंद खोपकर

@maharashtracity

मुंबई: गुजरातमधील (Gujarat) आगामी विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठीच वेदांत प्रकल्प (Vedant Project) गुजरातला दिला, असा आरोप करतानाच यापुढे मुंबई गुजरातला दिली तरी आश्चर्य वाटणार नाही, अशी टीका कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (MPCC President Nana Patole) यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली.

प्रदेशाध्यक्ष पटोले म्हणाले, ग्रामपंचायत निवडणुकांच्या निवडणुकीत १७५ ठिकाणी कॉंग्रेस विजयी झाली. मात्र, भाजपच्या आयटी सेलने (BJP IT cell) माध्यमांची दिशाभूल केली. चुकिची आणि खोटी माहिती देऊन लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची विश्वासार्हता कमी करण्याचे काम भाजप करत आहे. त्याऐवजी शेतकऱ्यांना नुकसानभरपाई, बेरोजगारी, महागाई, रस्त्यावरील खड्ड्यांचा प्रश्न यावर भाजप आयटी सेलने लक्ष केंद्रित करावे. राज्यातील सरकार हे इडी सरकार आहे, त्यांनी ताबडतोब नोकरभरती सुरू करावी, अशी मागणीही पटोले यांनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या वाढदिवशी राज्यातील तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली. यावरून शेतकऱ्यांच्या भावना किती तीव्र आहेत हे स्पष्ट होते, असेही नाना पटोले म्हणाले. आपल्या प्रदेशाध्यक्ष पदी अशोक चव्हाण येतील, अशा बातम्या दिल्या जात असल्याबद्दल पटोले यांनी खुलासा केला की, यासंदर्भातील वृत्त चुकीचे आहे. पक्षाने जी जी जबाबदारी दिली ती निष्ठेने पार पाडली. बूथ अध्यक्षपद दिले तरी तो सर्वात उत्कृष्ट बूथ करून दाखवू असेही ते उत्तरात म्हणाले.

कॉंग्रेसमध्ये लोकशाही आहे, असे राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या अध्यक्षतेसंदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले. गांधी-नेहरु घराण्याने देशासाठी असिम त्याग केला आहे. राहुल गांधी ही देशातील युवकांची धडकन बनली आहे, असा दावा त्यांनी केला. यावेळी राष्ट्रीय अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष राजेश लाहोठिया यांनी संघ परिवार संविधान बदलण्याचा प्रयत्न करीत आहे असा आरोप केला. संविधान रक्षक म्हणून लोकांनी पुढे यावे, असे आवाहनही कॉंग्रेसच्या वतीने केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here