By Sadanand Khopkar

Twitter : @maharashtracity

नागपूर: ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर शहराला सध्याच १२०दशलक्ष लिटर ऐवजी १४० द.श.ल.लि.पाणी पुरवठा करण्यात येत आहे. यासाठी आकारण्यात येणारा दिडपट दंड रद्द करण्यासंदर्भात बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तर तासात एका प्रश्नाच्या उत्तरात दिले.

भाजप आमदार कुमार आयलाणी यांनी हा प्रश्न उपस्थित करताना वाढीव पाणी आरक्षणाबाबत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि जलसंपदा विभाग यांच्यात करारनामा न झाल्याने या पाण्यासाठी दिडपट दंडात्मक दर आकारण्यात येत आहे का असे विचारताना तो रद्द करण्याची मागणी केली होती.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यावेळी मुंबई मनपा स्वतः धरणे बांधू शकते. तशी इतर महापालिकांनी का बांधू नयेत असे विचारता, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, सूर्या योजनेचे काम अंतिम टप्प्यात आहे. काळू व शाई धरण योजनेपैकी काळू प्रकल्प आम्ही पुढे नेणार आहोत असे जाहीर केले.

भाजप सदस्य किसन कथोरे यांनी यावेळी काळू प्रकल्प पुढे नेण्यासाठी पुनर्वसन प्रश्न मार्गी लावा, अशी मागणी केली. मात्र शाई प्रकल्प कोणत्याही स्थितीत पुढे जाऊ देणार नाही असा इशारा दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here