@maharashtracity

भाजपने केलेल्या टिकेला महापौरांच्या चोख उत्तर

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांचे (Chitra Wagh) थेट नाव न घेता महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांनी दोघांवर शेलक्या शब्दात टीका केली आहे. राणी बागेत (Rani chi baug) पुढच्या वेळी हत्तीच्या पिल्लाला ‘चंपा’ तर माकडाच्या पिल्लाचे नाव चिवा ठेवू ठेवण्यात येईल, असे सांगत महापौरांनी भाजपने केलेल्या टीकेला चोख उत्तर दिले आहे.

राणीच्या बागेत जन्मलेल्या पेंग्विनच्या (Penguin) एका पिल्लाचे नाव मराठीत ठेवण्याऐवजी ‘ ऑस्कर’ (oscar) असे इंग्रजी भाषेतील नाव ठेवल्याने भाजपकडून शिवसेनेवर टीकास्त्र (BJP criticised Shiv Sena) सोडण्यात आले होते. त्याची गंभीर दखल घेऊन महापौर किशोरी पेडणेकर यांनी, भाजपला त्यांच्याच भाषेत चोख उत्तर दिल्याने आता या विषयाला तोंड फुटले आहे.

पुरस्काराला ‘ ऑस्कर’ हे नाव असणे भाजपला चालते, तर मग ‘ प्राणी व पक्षी यांचे नाव ‘ ऑस्कर’ ठेवले तर यांच्या पोटात का दुखते, असा सवालही महापौरांनी उपस्थित केला आहे.

राणी बागेतील या नामकरण सोहळ्यावरून भाजपने टीका केल्याने सत्ताधारी शिवसेना व भाजप यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे.

भाजपकडून पुन्हा एकदा महापौरांना टार्गेट केले जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे आता पालिका निवडणुकीपूर्वी मुंबई महापालिकेत (BJP) जंगी राजकारणाचा फड बघायला मिळणार आहे.

पालिकेतील घोटाळयाबाबत भाजपकडून होत असलेल्या आरोपांबाबत बोलताना पुराव्यासह आणि अभ्यासपूर्ण बोलावे, असा खबरदारीचा इशाराही महापौरांनी भाजपला दिला आहे.

तसेच, भाजपने केवळ विरोधाला विरोध आणि खालच्या स्तरावरची टीका करणं सोडावे, असा सल्ला महापौरांनी भाजपा आणि चित्रा वाघ यांना दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here