Twitter: @maharashtracity
मुंबई: मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचा उपक्रम असलेल्या पॉलिटिकल जर्नालिस्ट वेल्फेअर असोसिएशन (PJWA) आणि वॉकहार्ट हॉस्पिटल यांच्या संयुक्त सहकार्याने आज हृदय रोग चिकित्सा शिबिर आयोजित करण्यात आले. या तपासणी शिबिराचा लाभ सुमारे 60 पत्रकारांनी घेतला अशी माहिती असोसिएशनचे उपाध्यक्ष चंदन शिरवाळे यांनी दिली.
विधान भवनातील पत्रकार कक्षात झालेल्या या शिबिराला वॉकहार्ट हॉस्पिटलच्या डॉ झरणा शहा यांच्यासह पल्लवी सावंत, दिपाली चौरे, आदित्य शिंदे, कुणाल फडके आणि उमेश कोळंबकर उपस्थित होते. मंत्रालय आणि विधिमंडळ वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांचा मधुमेह आणि अन्य चाचण्यासह इसिजी काढण्यात आले. ज्या पत्रकारांना पुढील तपासणीची गरज आहे अशांना वॉकहार्ट हॉस्पिटलच्या डॉक्टरांची वेळ घेऊन तपासणी करण्याचा सल्ला देण्यात आला.
साठहून अधिक पत्रकारांनी या तपासणी शिबिराचा लाभ घेतला. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी असोसिएशनचे अध्यक्ष विवेक भावसार, उपाध्यक्ष चंदन शिरवळे, सचिव मंदार पारकर, दह सचिव दिलीप सपाटे, कार्यकारिणी सदस्य वैशाली होगले, नितीन तोरसकर, श्याम हांडे यांनी नियोजन केले.
शिबिरासाठी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, प्रधान सचिव जितेंद्र भोळे, विजय काळे, जगदाळे यांचे सहकार्य लाभले.