@maharashtracity

मुंबई: रायगड जिल्ह्यामध्ये एका महिला सरपंचाची हत्या (murder of woman Sarpanch) करण्यात आल्याची गंभीर घटना राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशन (winter session) सुरू असताना काळात घडली आहे. त्यामुळे राज्य शासनाने याविषयी तातडीने निवेदन करावे, अशी मागणी विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी आज पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनद्वारे विधान परिषदेत केली.

हा विषय गंभीर आहे. या प्रकरणाची माहिती घेतली आहे. त्यादृष्टीने तपास सुरु असल्याचे उत्तर पालकमंत्री आदिती तटकरे (Guardian Minister Aditi Tatkare) यांनी यावेळी दिली.

विरोधी पक्ष नेते दरेकर म्हणाले, कालच विधानपरिषदेत (Upper House) कायदा व सुव्यवस्थेवर चर्चा करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण रायगड जिल्ह्यात अतिशय तीव्र भावना आहेत. गुन्हेगारांना कशाचीही भीती उरलेली नाही, हेच यावरून दिसून येते.

Also Read: आदिस्ते महिला सरपंचाच्या खुनाचा तपासाचे पोलिसांसमोर आव्हान

रायगडमधील महाड तालुक्यातील मौजे आदिस्ते येथील मीनाक्षी मनोहर खिडबिडे या महिला सरपंच होत्या. या सरपंच महिला अतिशय गरीब कुटुंबातील होत्या. जंगलात रस्त्याच्या कडेला काल दुपारी त्यांचा मृतदेह सापडला. त्यांच्यावर बलात्कार झाल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे.

लाकुडफाटा आणण्यासाठी त्या गेल्या होत्या. सायंकाळी महाडच्या ग्रामीण रुग्णालयात त्यांचा मृतदेह आणण्यात आला. ग्रामीण रुग्णालयात महिला डॉक्टर नाहीत. बलात्कार झाल्याचा संशय असल्यामुळे महाडचे आरएमओ डॉ. भास्कर जगताप यांनी सेकंड ओपिनियनसाठी मृतदेह जे.जे.रुग्णालयाकडे पाठवला आहे.

गावापासून 500 मीटर अंतरावर त्यांचा मृतदेह सापडला होता, अशी माहितीही दरेकर (Pravin Darekar) यांनी विधान परिषद सभागृहाला दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here