गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तात्काळ राजीनामा द्यावा
विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांची मागणी
मुंबई: पालघरमध्ये (Palghar) मॉब लिंचिंगची (mob lynching) अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथे चोरीच्या संशयावरून जमावाने केलेल्या मारहाणीत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना पालघरमधील गडचिंचले गावात घडली आहे. कायदा सुव्यवस्थेचा (law and order) पूरता बोजवारा उडाला आहे, पालघरच्या हत्याकांडाने गृह खात्याची अब्रु वेशीवर टांगली गेली आहे, त्यामुळे या घटनेची नैतिक जवाबदारी स्विकारुन गृहमंत्री (home minister) अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी तात्काळ राजीनामा (resignation) द्यावा अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते (LoP) प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी केली आहे.
सुशील गिरी महाराज, जयेश आणि नरेश येलगडे हे तिघे एका व्हॅनमधून सूरतमध्ये (Surat) कुण्या एका व्यक्तीच्या अंत्यदर्शनासाठी जात होते. या तिघांपैकी एक जण कार चालवत होता.
पोलिस (police) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २०० हून अधिक गावकऱ्यांनी चोर समजून या तिघांची गाडी थांबविली. सुरुवातीला त्यांनी त्यांच्यावर दगडफेक केली आणि जेव्हा त्यांची गाडी थांबली तेव्हा तिघांना बाहेर काढून गावकऱ्यांनी त्यांना लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण केली. यात तिघांचा मृत्यू झाला.
दरेकर यांनी या मृत्यूला गृहमंत्री अनिल देशमुख यांना जबाबदार धरले आहे. राज्य सांभाळता येत नसेल तर देशमुख यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी दरेकर यांनी केली आहे.