By Sadanand Khopkar

Twitter: @maharashtracity

मुंबई: राज्यात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेली तणावाची परिस्थिती पाहता या दंगली संभाजी नगर, अकोला पर्यंत मर्यादित न राहता गाव पातळीवर दंगली घडविण्याचा सरकारचा
घाट आहे, असा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना केला.

कर्नाटक निवडणुकीवेळी भाजपने बजरंगबलीचे नाव घेतले. त्यानंतर त्यांचा पराभव झाला आहे, महाराष्ट्रातही जनता त्यांना उत्तर देईल, असा दावा दानवे यांनी केला.

आळंदी येथे वारकऱ्यांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी दानवे म्हणाले की, वारकऱ्यांवर पोलिसांकडून अमानुष लाठीचार्ज झाला आहे. या आधी महाराष्ट्राच्या इतिहासात कोणीही वारकऱ्यांवर लाठी उगरण्याचं काम केलं नव्हतं. या सरकारवर जनतेच्या माध्यमातून लाठी उगारल्याशिवाय जनता स्वस्थ बसणार नाही. वारकऱ्यांवर लाठीचार्ज करणारे हे सरकार हिंदुत्व विरोधी असल्याची टीका अंबादास दानवे यांनी केली.

जातीय तणाव निर्माण करणाऱ्यांवर यापूर्वी कठोर कारवाई केली असती तर आज असे प्रकार घडले नसते. राज्यातील कायदा व सुव्यवस्था, महिला सुरक्षितता आदी मुद्द्यांवर दानवे यांनी सरकारवर जोरदार टीका केली.

राज्यात कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. भ्रष्टाचाराने थैमान घातला आहे. जातीयवाद हे सरकार प्रायोजित आहे, असा आरोप करत दानवे यांनी या घटनाबाह्य सरकारची अनागोंदी रोखली पाहिजे, अशी आमची भूमिका असल्याचे म्हटले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here