@maharashtracity
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह महिलांची माफी मागण्याची मागणी
धुळे: भाजपाचे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी शिरूरमधील (पुणे) जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल (NCP) व महिलांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याने मंगळवारी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने त्यांच्या प्रतिमेस जोडे मारण्यात आले.(controversial statement by Praveen Darekar against NCP women)
शहरातील झाशीराणी चौकात झालेल्या या जोडेमारो आंदोलनात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा ज्योती पावरा, सरोज कदम, हिमानी वाघ, मालती पाडवी, संजीवनी पाटील, तरुणा पाटील, माधूरी पाटील, रेखा सुर्यवंशी, शारदा भामरे आदी कार्यकर्त्यां सहभागी झाल्या होत्या.
राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमीतने १३ सप्टेंबर रोजी आयोजित केलेल्या एका कार्यकर्ता मेळाव्यात दरेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व महिलांबाबत आक्षेपार्ह विधान केले आहे. त्याचा राष्ट्रवादी पक्ष जाहीर निषेध करते.
दरेकर हे कधीतरी धुळे जिल्हा दौर्यावर आलेच तर राष्ट्रवादी महिला काँग्रेस त्यांना काळे फासल्याशिवाय राहणार नाही. सत्ता गेल्याने भाजपा व दरेकर यांना वैफल्य आले आहे. त्यातूनच ते असे विधाने करुन आपली बौद्धिक दिवाळखोरी दाखवित आहेत. दरेकरांनी तातडीने राष्ट्रवादी पक्षाची आणि महिलांची माफी मागावी, असे आवाहन पावरा यांनी केले आहे.