By सदानंद खोपकर

@maharashtracity

मुंबई: मुंबईतील १६ हजारांपेक्षा अधिक उपकरप्राप्त जुन्या इमारती (dilapidated cess buildings)आहेत. त्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी म्हाडाकडे (Mhada) केवळ शंभर कोटी रुपयांचा निधी आहे. तो अपुरा पडतो. अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याशी चर्चा करून हा निधी किमान अडीचशे कोटी करता येईल का याबाबत पाठपुरावा करू, असे उत्तर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Dr Jitendra Awhad) यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेला दिले. संक्रमण शिबिरात (transit camp) घुसखोरीला जे करसंकलक दोषी आढळतील तेथे चौकशी करून कारवाई केली जाईल, अशी घोषणा त्यांनी केली.

या विषयावर अमिन पटेल (Congress MLA Amin Patel) यांनी लक्षवेधीमार्फत सरकारचे लक्ष वेधले होते. उत्तर देताना गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले, संक्रमण शिबिरांची संख्या कमी आहे. तसेच अस्तित्वात असलेल्या संक्रमण शिबिरांमध्ये असलेली घुसखोरी (encroachment) ही मोठी डोकेदुखी आहे.

ते म्हणाले, ही घुसखोरी आत्ताच झालेली नाही. मात्र, घुसखोरीला आपलाच विभाग जबाबदार असल्यामुळे त्याची लाज वाटते. कर संकलकांच्या आशीर्वादाशिवाय हे शक्य नाही. या प्रकरणाची आपण गंभीर दखल घेतली आहे. उच्चस्तरीय चौकशी करणार आहोत. संक्रमण शिबिरांतही चौकशी करण्यात येईल. जिथे करसंकलक दोषी आढळतील, तिथे त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्‍वासन त्यांनी सभागृहात दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here