हिमालयपुत्र सुंदरलाल बहुगुणा हे पर्यावरण योद्धा होते’: राज्यपाल कोश्यारी

0
279


@maharashtracity

मुंबई: महाराष्ट्राचे (Maharashtra) राज्यपाल (Governor) भगतसिंह कोश्यारी (Bhagat Sinh Koshyari) यांनी प्रसिद्ध पर्यावरणवादी व चिपको आंदोलनाचे प्रणेते पद्मविभुषण सुंदरलाल बहुगुणा (Sunderlal Bahuguna) यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

सुंदरलाल बहुगुणा हे हिमालय (Himalaya) पर्वतशृंखला तसेच पर्यावरण (environment) संरक्षण व संवर्धन कार्यास समर्पित असे ऋषितुल्य व्यक्तिमत्व होते. स्वातंत्र्य संग्राम सैनिक असलेल्या बहुगुणा यांनी जीवनात महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांचे तत्वज्ञान अंगीकारत सत्याग्रहाचा अवलंब केला.

त्यांनी व्यसन मुक्ती कार्यात पर्वतीय महिलांना संघटीत केले. त्यांनी चिपको या ऐतिहासिक आंदोलनाचे नेतृत्व केले तसेच प्रकल्प बाधितांच्या पुनर्वसनासाठी कार्य केले. सुंदरलाल बहुगुणा यांचा माझा घनिष्ठ परिचय होता हे माझे भाग्य समजतो. त्यांच्या निधनामुळे आपण पर्यावरण रक्षणासाठी समर्पित लढवय्या योद्धा गमावला आहे.

हिमालयपुत्र दिवंगत श्री बहुगुणा यांच्या आत्म्यास प्रभूचरणांजवळ स्थान मिळो ही प्रार्थना करतो व आपल्या शोक संवेदना त्यांच्या कुटुंबियांना तसेच त्यांच्या असंख्य चाहत्यांना कळवतो असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here