Twitter: @maharashtracity
मुंबई: माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना सोमवारी रात्री मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर सेमीकोमाच्या गंभीर स्थितीत आयसीयूत उपचार सुरू असून सध्या त्यांच्या मेंदूतील रक्तस्त्राव स्थिर असून उपचार सुरु असल्याचे हिंदुजा रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. तुर्तास त्यांची प्रकृती गंभीर पण स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
मनोहर जोशी यांना सोमवारी रात्रीपासूनच अस्वस्थ वाटत होते. त्यामुळे त्यांना उशिरा रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आले. दाखल करताना ते गंभीर स्थितीत होते. मात्र त्यांना व्हेंटिलेटरवरची गरज लागत नसून ते स्वतःहून श्वास घेत असल्याचे उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले. मात्र त्यांना ब्रेन ट्यूमर स्थितीतील गुंतागुंत आहे. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. प्रकृती स्थिर असली तरी देखील वैद्यकीय उपचारातील गंभीर व्यवस्थापनाची गरज असल्याचे डॉक्टरांकडून स्पष्ट करण्यात आले.