@maharashtracity
मुंबई: लखीमपूरखेरी येथील दुर्घटनेला जबाबदार केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाला आठवडाभरानंतर पोलिसांनी अटक केली आली आहे. लखीमपूरखेरी घटनेबाबत शेतकऱ्यांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.
ते मुंबईत बेस्ट उपक्रमाच्या एका नियोजित कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते.
लखीमपूरखेरी येथील दुर्घटना दुर्दैवी आहे. या दुर्घटनेच्या आठवडाभरानंतर केंद्रीय मंत्र्यांच्या संबंधित मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. इतके दिवस युपी पोलीस काय करत होते ? या एकूणच घटनेबाबत शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप आहे, असे मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. (Unrest among farmers over Lakhimpura kheri incident)
या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने ११ ऑक्टोबर रोजी बंद पुकारला आहे. त्याबाबत बोलताना आदित्य ठाकरे यांनी, “उद्याच्या महाराष्ट्र बंदला आमचा पूर्ण पाठिंबा आहे”, असे सांगितले. (Shiv Sena extended full support to Maharashtra Bandh).