उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती

By अनंत नलावडे

@maharashtracity

एक देश एक निवडणूक (One Nation; One Election) या भूमिकेला आपले समर्थन आहे. एक देश एक निवडणूक हे कठीण असले तरी आमच्या काळात आम्ही सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. या समितीच्या अहवालानुसार वर्षातील ३६५ दिवस कोणत्या ना कोणत्या भागात निवडणूक आचारसंहिता लागू असते. देशात एकत्र निवडणूक झाल्या तर मोठ्या प्रमाणात निवडणूक खर्च वाचेल. शिवाय राजकीय पक्षांना सोयीचे राजकारण न करता एक भूमिका घेऊन जनतेसमोर जाता येईल, असे स्पष्ट मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी गुरुवारी येथे प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केले.

शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना राजकारणातील कटुता दूर झाली पाहिजे असे विधान केले. याबद्दल विचारले असता फडणवीस यांनी आपण राऊत यांचे विधान ऐकलेले नाही. तथापि, राजकारणातील कटुता दूर करायची असेल तर ते सगळ्यांना मिळून ठरवावे लागेल. केवळ एक पक्ष हे करू शकणार नाही. नेत्यांनी शांत राहायचे आणि इतरांना बोलायला लावायचे ही पद्धत बंद करावी लागेल, असा सणसणीत इशाराही त्यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे नाव न घेता दिला.

प्रतापगडावरील (Pratapgarh) अतिक्रमण हटविण्यास सुरुवात झाली आहे. अतिक्रमण हटविण्याचा निर्णय २००७ साली झाला होता. या निर्णयाची अंमलबजावणी २०१७ मध्ये सुरु झाली होती. परंतु, त्यावेळी काही कायदेशीर अडथळे निर्माण झाले होते. अतिक्रमण हटवावे म्हणून शिवप्रेमींनी आंदोलन केले होते. आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले पण अतिक्रमण निघत नव्हते. पण आता शिवप्रेमींसाठी समाधानाची बाब म्हणजे अतिक्रमण काढण्यास सुरुवात झाल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here