मराठवाड्याची रणरागिणी मुंबई मार्गे दिल्लीच्या राजकारणात
मुंबई: मराठवाड्यातील (Marathwada) औरंगाबाद (Aurangabad) येथून मुंबईत (Mumbai) आपले कर्तृत्व गाजविणाऱ्या रणरागिणी डॉ. प्रा. उज्ज्वला जाधव (Ujjwala Jadhav) यांची भारतीय जनता पक्ष (BJP) अनुसूचित मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर विशेष निमंत्रित म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
उच्च विद्या विभूषित अशा डॉ. प्रा. उज्ज्वला जाधव यांनी भारिप बहुजन महासंघाच्या (BRP Bahujan Mahasangh) प्रदेश प्रवक्त्या म्हणून यापूर्वी कार्य केले आहे.
प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या नेतृत्वाखाली पक्ष बांधणी करता करता डॉ. प्रा. उज्ज्वला जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करुन भारतीय जनता पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले. परंतु गेल्या काही वर्षांपासून त्यांच्या कडे पक्षाने कोणतीही जबाबदारी सोपविली नव्हती. पण धीरज का फल मीठा होता है, या न्यायाने भारतीय जनता पक्षाने आता डॉ. प्रा. उज्ज्वला जाधव यांच्या कार्य कर्तृत्वाला साजेशी राष्ट्रीय पातळीवर अनुसूचित मोर्चाच्या कार्यकारिणीवर विशेष निमंत्रित म्हणून नेमणूक केली.
महाराष्ट्रातील (Maharashtra) भारतीय जनता पक्षाच्या महिलांना विशेषतः मागासवर्गीय बांधवांना आणि भगिनींना उज्ज्वल भवितव्य प्राप्त करुन देण्यासाठी डॉ. प्रा. उज्ज्वला जाधव या प्रयत्नशील राहतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.