@maharashtracity

मुंबई: मुंबईसह (Mumbai) जगभरात सध्या पर्यावरण (Environment), ग्लोबल वॉर्मिंग (Global warming), कोरोना (corona) या विषयांची जोरदार चर्चा आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे पृथ्वीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. या सर्व विषयांची गंभीर दखल घेऊन यंदाच्या गणेशोत्वाच्या (Ganesh Festival) निमित्ताने पर्यावरणाची ‘जाणीव’ करून देण्यासाठी सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या ‘जाणीव’ या संस्थेतर्फे ‘माझा बाप्पा’ घरगुती गणेश दर्शन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

यासंदर्भातील माहिती, ‘जाणीव’ या संस्थेचे अध्यक्ष, माजी मंत्री खा. अरविंद सावंत (Shiv Sena MP Arvind Sawant) यांनी दिली. याप्रसंगी, या स्पर्धेचे आयोजक संतोष परब, श्रीनिवास नार्वेकर, दीपक म्हात्रे, सुप्रिया आदी मान्यवर उपस्थित होते.

यंदाच्या गणेशोत्सवात कोरोनामुक्त घर, पर्यावरण, पाणी हेच जीवन, ग्लोबल वार्मिंग आदी महत्वाच्या विषयाला अधिक महत्व देऊन संपूर्ण मुंबईतील घरगुती गणेश भक्तांसाठी ‘जाणीव’ या सामाजिक संस्थेमार्फत ‘माझा बाप्पा’ घरगुती गणेश दर्शन ऑनलाईन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेत स्पर्धकांना विनामूल्य सहभागी होता येणार आहे. स्पर्धकांनी घरगुती गणेशमूर्ती व सजावट, देखावा यांचे दोन फोटो द्यावे लागणारं आहेत. प्रवेश अर्जासाठी स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी www.mazabappa.in या वेबसाईटला भेट द्यावी, अशी माहिती खा.अरविंद सावंत यांनी दिली आहे. यावेळी, खा. सावंत यांच्या हस्ते वेबसाईटचे लोकार्पण करण्यात आले.

ही स्पर्धा लोकसभा (Lok Sabha) व विधानसभा (Vidhan Sabha) मतदारसंघात तीन स्तरांवर घेतली जाणार आहे. यामध्ये प्राथमिक फेरी, अंतिम फेरी व महाअंतिम फेरी घेण्यात येणार आहे. महाअंतिम फेरीतील प्रथम क्रमांक विजेत्यास हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे चषक, द्वितीय विजेत्यास जागृती सन्मान व तृतीय विजेत्यास संवेदना सन्मान पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच, तीन उत्तेजनार्थ क्रमांकांनाही पारितोषिके देण्यात येणार आहेत.

एकूण १३२ अधिक ७५ आणखीन पारितोषिके दिली जाणार आहेत. रोख रक्कम, सन्मान चिन्ह व सन्मान पत्र असे या पारितोषिकाचे स्वरूप असणार आहे.

आज जगभरात पाणी समस्या, समुद्र पातळीतील वाढ, कोरोना महामारी, ग्लोबल वार्मिंग, पर्यावरण संकट आदी संकटांकडे अमेरिकेसह महत्वाच्या राष्ट्रांनी दुर्लक्ष केल्याने ही संकटे जीवघेणी ठरत आहेत. त्यामुळे संपूर्ण पृथ्वीवरील जनजीवन धोक्यात आले आहे. मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तीय हानी होत आहे. एकूणच जगभरात पर्यावरण संकट ओढवले आहे. त्यामुळे या जागतिक या संकटांवर मात करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात यावी, त्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपले योगदान द्यावे, या उदात्त हेतूने येत्या गणेशोत्सवात या पर्यावरणीय संकटांची ‘जाणीव’करून देण्यासाठी ‘ जाणीव’ या सामाजिक कार्यात अग्रेसर संस्थेमार्फत ‘माझा बाप्पा’ घरगुती गणेश दर्शन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी दिली आहे.

प्रदूषणाला हातभार लावणाऱ्या व समुद्र, तलाव येथील माशांचे जनजीवन धोक्यात आणणाऱ्या कागदाच्या लगद्याच्या, पीओपी च्या गणेशमूर्तींऐवजी पर्यावरणपूरक शाडू मातीच्या गणेश मूर्तींचा वापर गणेशोत्सवात करण्यात यावा, असे आवाहन खा.अरविंद सावंत यांनी यावेळी केले.

तसेच, विघ्नहर्ता गणेशाने कोरोना, पर्यावरण संकटे, पाणी समस्या, ग्लोबल वार्मिंग आणि दारिद्र्य आदी संकटांचे विघ्न दूर करावे, असे साकडे खा. अरविंद सावंत यांनी बाप्पाला घातले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here