धनंजय मुंडे यांची सरकारकडे पुन्हा मागणी

@maharashtracity

मुंबई: राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय झाला असला तरी, बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील विविध जिल्ह्यात सोयाबीन व अन्य पिकांवर गोगलगायीचा प्रादुर्भाव झाल्याने जे नुकसान झाले होते, त्या शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय झाला नाही. याबाबत माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी नाराजी व्यक्त करत, संबंधित शेतकऱ्यांना बोंड अळीच्या वेळी ज्याप्रमाणे मदत केली, त्या धर्तीवर विशेष आर्थिक मदत करावी, अशी मागणी मुंडे यांनी केली आहे.

धनंजय मुंडे यांनी यासंदर्भात याआधीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्राद्वारे मागणी केली होती.

मागील काळात बोंड अळीचा कापसावर (cotton) प्रादुर्भाव झाला तेव्हा ज्याप्रमाणे विशेष आर्थिक पॅकेजद्वारे शेतकऱ्यांना मदत झाली होती, त्याच प्रमाणे मदतीची आवश्यकता असल्याचे धनंजय मुंडे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

बीड जिल्ह्यातील सुमारे 4 हजार हेक्टर क्षेत्रातील सोयाबीन पिकांचे गोगलगायीनी (crops loss by snails) अक्षरशः वाटोळे केले. शेतकऱ्यांनी तीन-चार वेळा पेरण्या केल्या. मात्र, गोगलगायीचे नियंत्रणही नाही व हंगाम संपत चालला तरी पीक हाती लागण्याची काही चिन्हे नाहीत, अशी विदारक परिस्थिती शेतकऱ्यांची झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here