@maharashtracity

मुंबई: राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी नवनीत राणा आणि रवी राणा यांच्याबद्दल अपशब्द वापरले आहेत. यानंतर चित्रा वाघ (BJP Chitra Wagh) यांनी वडेट्टीवार यांचा एक व्हिडीओच ट्विट केला असून वडेट्टीवारांना इशारा दिला आहे. “महिलांबद्दल अशी गलिच्छ भाषा वापरणाऱ्या मंत्र्यांचा मी निषेध करते अशांचं जोपर्यंत महिला खेटरं पुजन करणार नाही, तोपर्यंत यांचा मेंदू ठिकाण्यावर येणार नाही” असं म्हणत निशाणा साधला आहे. चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे.

कुणाच्या घरावर जाऊन आंदोलन करणे याला आमचा विरोधचं… पण हनुमान चालिसाचे पठण करणे हा हिंदूस्थानात देशद्रोह कसा काय होऊ शकतो?, तसेच महिलांबद्दल अशी गलिच्छ भाषा वापरणाऱ्या मंत्र्यांचा मी निषेध करते अशांचं जोपर्यंत महिला खेटरं पुजन करणार नाही तोपर्यंत यांचा मेंदू ठिकाण्यावर येणार नाही” असं म्हणत चित्रा वाघ यांनी टीकास्त्र सोडलं आहे.

खार पोलिसांनी अटक केलेल्या खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) या दोघांना रविवारी वांद्रे येथील सुटीकालीन न्यायालयात हजर केले. राणा दाम्पत्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सरकारी वकीलांनी न्यायालयात सांगितले. न्यायालयाने दोघांना न्यायालयीन कोठडी (Magistrate Custody) सुनावली आहे. त्यानुसार, त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली.

राणा दाम्पत्याला न्यायालयीन कोठडी

सामाजिक तेढ निर्माण करणारे विधान केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या राणा दाम्पत्याला वांद्रे न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. राणा यांच्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, मुंबई पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी आता राणा दाम्पत्याने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. याच दरम्यान नवनीत राणा, रवी राणांबद्दल काँग्रेस नेत्याने अपशब्द काढले आहेत. हनुमान चालीसावरून त्यांच्यावर जोरदार टीका केली. यानंतर आता त्यांच्यावर भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी आपला संताप व्यक्त करत हल्लाबोल केला आहे.

राजद्रोहाचा गुन्हा का?

राणा दाम्पत्याने मुख्यमंत्र्यांबाबत अपशब्द वापरून त्यांना आव्हान दिले होते. १४९ अंतर्गत नोटीस बजावत शांतता ठेवण्यास सांगून परत जाण्यास सांगितले होते. मात्र त्या नोटीसला न जुमानता सरकारला आव्हान दिले. त्यामुळे १२४ (अ) अंतर्गत राजद्रोहाचाही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here