maharashtracity
प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांची माहिती
मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray) यांच्यावर आज करण्यात आलेली सर्व्हायकल स्पाईन (Cervical spine surgery) संबंधित शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची माहिती एच.एन. रिलायन्स रुग्णालयाचे ( H N reliance hospital) डॉ. अजित देसाई ( Dr. Ajit desai) आणि डॉ. शेखर भोजराज ( Dr. Shekhar bhojraj) यांनी दिली आहे. या शस्त्रक्रियेदरम्यान मुख्यमंत्र्यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर होती.
आता शस्त्रक्रियेनंतर त्यांना रुग्णालयातील त्यांच्या कक्षात हलविण्यात आले, असेही डॉक्टरांनी सांगितले आहे. डॉ. अजित देसाई हे हृदयरोग तज्ज्ञ ( Heart surgen specialist) असून डॉ. शेखर भोजराज हे स्पाईन (पाठीचा कणा) सर्जन (शल्यचिकित्सक) ( Spine surgen) आहेत.
Also Read: पालिका अतिक्रमण विरोधी कारवाईप्रसंगी दुकानदारांचा अरेरावीपणा
मुख्यमंत्र्यावर आज सकाळी ७ः३० वाजता एच. एन. रिलायन्स हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया सुरू झाली. वरिष्ठ आँर्थो सर्जन ( senior artho surgen) डॉक्टरांच्या टीमने सुमारे तासभर ही शस्त्रक्रिया केली. सकाळी ८ः४५ वाजता डॉक्टरांची टीम बाहेर आली. त्यांनी शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचे सांगितले.
मुख्यमंत्र्याना भूल देवून उपचार केल्याने पुढील काही तास त्यांना विश्रांती घ्यावी लागणार आहे. मात्र त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. शस्त्रक्रियेनंतर त्यांना रुग्णालयातील त्यांच्या कक्षात हलविण्यात आले आहे.