@maharashtracity
धुळे: कोरोना प्रतिबंधासाठी १८ वर्षावरील सर्वांना सरसकट लसीकरण सुरू झालेले असून आता लस ही चांगल्या संख्येत उपलब्ध होत आहे. त्यामुळे धुळे शहरातील प्रत्येक महाविद्यालयात लसीकरण मोहीम (Vaccination drive in colleges) घ्यावी, अशी मागणी युवा सेनेच्या (Yuva Sena) वतीने करण्यात आली आहे. याबाबत आज धुळे मनपा आयुक्त अजित टेकाळे यांना निवेदन देण्यात आले.
प्रामुख्याने शहरातील जय हिंद सिनिअर महाविद्यालय, एस.एस.व्ही.पी.एस महाविद्यालय, व्ही.डब्ल्यू.एस. महाविद्यालय, मा.ध. पालेशा महाविद्यालय., एस.एन.डी.टी. महाविद्यालय, अजमेरा महाविद्यालय, मोराणे महाविद्यालय, डॉ.बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेज, यासह इतर
महाविद्यालयांमध्ये १८ वर्षावरील शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी लसीकरण मोहीम राबवावी.
आजही लसीकरण केंद्रावर महाविद्यालयिन विद्यार्थ्यांची संख्या कमी प्रमाणात दिसते आहे. विद्यार्थी-विद्यार्थीनी लस घेण्यापासून वंचित आहेत. त्यामुळे महापालिकेने प्रत्येक महाविद्यालयात लसीकरण करावे. ही मोहिम राबविण्यासाठी युवासेना टीम महानगरपालिका आणि महाविद्यालयासोबत राहून सर्वोपतरीं मदत करेल. महाविद्यालय प्राचार्य व महानगरपालिका दोघांमध्ये समनव्य साधण्याचे काम ऍड.पंकज गोरे करतील, असे आश्वासन निवेदनाद्वारे देण्यात आले.
लसीकरण शिबिर राबविण्याच्या दिवशीही पूर्णवेळ उपस्थित राहून युवासेना टीम मदत करेल. फक्त आपण यासाठी दोन पाऊल पुढे यावे. जेणेकरून जास्तीतजास्त १८ वर्षावरील सर्व विद्यार्थी पुर्णपणे लसीकरण होतील. युवासेनाप्रमुख तथा पर्यावरण-पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या मार्गदर्शनाखाली लसीकरण मोहिमेत सहभागी होऊन महाराष्ट्रभर युवासेना टीम काम करते आहे. त्यानुसार धुळे शहरातील सर्वच महाविद्यालयामध्ये लसीकरण मोहीम राबवावी अशी मागणी करण्यात आली.
यावेळी युवासेना राज्य सहसचिव ऍड.पंकज गोरे, युवासेना जिल्हा युवा अधिकारी संदीप मुळीक, उपजिल्हा युवा अधिकारी हरीष माळी, शहर युवा अधिकारी अमित खंडेलवाल, देवपूर शहर अधिकारी जितेंद्र पाटील, उपशहर अधिकारी आकाश शिंदे, स्वप्निल सोनवणे, भूषण पाटील, राहुल इथापे, ज्ञानेश्वर देवरे, निलेश चौधरी, दर्शन कंबायत सह सर्व युवासेना पदाधिकारी उपस्थित होते.