जुहू येथील बंगल्यातील अनधिकृत बांधकाम

७ दिवसांची नोटीस

अन्यथा अनधिकृत कामांवर हातोडा

पालिकेने कारवाई केल्यास खर्च वसुलणार

@maharashtracity

मुंबई: सध्या केंद्रीय मंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे यांचा शिवसेनेशी विशेषतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray), खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांच्याशी कलगीतुरा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर राणे यांच्या जुहू येथील बंगल्याची काही दिवसांपूर्वीच झडती घेतली होती. आता मुंबई महापालिकेने (BMC) या बंगल्यातील बांधकाम अधिकृत असल्याबाबत राणे यांनी ७ दिवसांत समाधानकारक उत्तरे देऊन सिद्ध न केल्यास पालिकेकडून राणे यांच्या ‘अधिश’ बंगल्यातील अनधिकृत बांधकामांवर ‘हातोडा’ चालविण्यात येणार आहे.

तशी नोटीसच महापालिकेकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना पाठविण्यात आली आहे. त्यामुळे आता एकीकडे दिशा सालीयन (Disha Salian) प्रकरणातील आक्षेपार्ह वक्तव्यावरून कायदेशीर कारवाईचा ससेमिरा मागे लागलेल्या राणे पिता-पुत्रांचा एक पाय खोलात अडकलेला असताना आता दुसरा पायही जुहूच्या बंगल्यात अडकणार आहे.

मुंबई महापालिकेने काही दिवसांपूर्वीच केंद्रिय मंत्री नारायण राणे यांच्या जुहू येथील ‘अधीश’ बंगल्यावर दुसऱ्यांदा भेट देऊन झाडाझडती घेतली होती. त्यावेळी पालिकेच्या पथकाला या बंगल्यात काही अनधिकृत बांधकाम आढळून आले होते. पालिका अधिकाऱ्यांनी बंगल्यातील अनधिकृत बांधकामाचे फोटोही काढले होते.

त्यानुसार पालिकेने राणे यांना कलम ३५१(१)ची नोटीस पाठवून या बंगल्यातील बांधकाम अधिकृत असल्याचे सिद्ध करावे अथवा अनधिकृत बांधकाम स्वतः पाडून टाकावे. अन्यथा सात दिवसांनी पालिका पथक बंगल्यात घुसून अनधिकृत बांधकामांवर (illegal instructions) हातोडा चालवून ते पाडणार आहे. तसेच, या पाडकामासाठी पालिकेला जो काही खर्च येईल तो राणे यांच्याकडून वसूल करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here