नितेश यांनी मनपाकडून गिरगाव व्ह्यूइंग डेकची पुन्हा मागवली माहिती

@maharashtracity

मुंबई: गिरगाव चौपाटीवर कोस्टल रेग्युलेटरी झोन ​​(CRZ) नियमांचे मुंबई महापालिकेने (BMC) उल्लंघन केल्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करत भाजपचे आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) यांनी आयुक्तांना पत्र लिहून त्याबाबत तपशीलवार माहिती मागवली आहे. त्यांनी अधिकार्‍याला माहिती सामायिक करण्याचा इशारा देखील दिला आहे. अन्यथा विधानसभेत विशेषाधिकार भंग प्रस्ताव (privilege motion) दखल करू, असा इशारा राणे यांनी पत्राद्वारे दिला आहे.

नितेश यांनी पत्रात नमूद केले आहे की, सुमारे 475 चौरस मीटरची व्ह्यूइंग गॅलरी (viewing gallery) समुद्री किनाऱ्याला लागून बांधकाम करण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी असलेल्या सीआरझेडची कोणतीही परवानगी न घेता गिरगाव चौपाटीवर बी.आर. तांबे चौकाजवळ उत्तरेकडे बांधण्यात येत आहे. याच पावसाचे पाणी समुद्रात सोडण्यासाठी असलेली पर्जन्य जलववाहिका याच डेकखाली आहे, याकडे निलेश यांनी लक्ष वेधले आहे.

नितेश यांची आपल्या पत्रात महानगर पालिका आयुक्तांना प्रश्न विचारला आहे की
पालिकेने सीआरझेड कायद्यांतर्गत कारवाई करणे अपेक्षित होते पण अजूनही काही कारवाई केली गेली नाही याबद्दल नितेश यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या बेकायदा बांधकामाबाबत यापूर्वी १ मे आणि ७ मे रोजी पत्र लिहिले होते, मात्र, त्यावरही कार्यवाही झाली नाही, असेही निलेश यांनी पत्रात नमूद केले आहे.

आयुक्तांना दिलेल्या तिसऱ्या स्मरणपत्रात राणे म्हणाले की, महापालिकेने आपल्याला आवश्यक असलेली माहिती तातडीने द्यावी. “मला माहिती वेळेत न दिल्यास मी विधीमंडळाच्या येत्या विधानसभेच्या अधिवेशनात विशेषाधिकार भंग प्रस्ताव मांडेन,” असा इशारा त्यांनी दिला आहे.

गिरगावात व्ह्यूइंग डेक बांधण्याची कल्पना पालिकेने २०२१ मध्ये मांडली आणि त्याच वर्षी ऑक्टोबरमध्ये बांधकामाला सुरुवात झाली. सुमारे 500 लोकांना समुद्रकिनारा पाहण्याच्या सुविधेचा आनंद घेता येत आहे. महापालिकेने चैत्यभूमीजवळ दादर चौपाटीवर आधीच असा एक डेक बसवला आहे आणि लवकरच वरळीतदेखील असा डेक बनविण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here