@maharashtracity

मुंबई: आझाद मैदानावर दंगल घडवून महिला पोलीस भगिनींशी गैरवर्तन करणारे आणि अमर जवान स्मृती स्तंभ तोडणाऱ्या ‘रझा अकादमी’सोबत (Raza Academy) सलगी वाढविणाऱ्या महाविकास आघाडी सरकारवर भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) यांनी कठोर शब्दात टीका केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून मशिदीवरील भोंगे (loudspeaker on masjid) आणि हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) या दोन विषयावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप होत आहेत. यावरून राजकीय वातावरण वातावरण चांगलेच तापलं आहे. हिंदुत्वाचा (Hindutva) मुद्दा घेऊन भाजप धर्माच्या नावाखाली राजकारण करत असल्याचा आरोप महाविकास आघाडीतील (Maha Vikas Aghadi) नेते करत आहेत.

भाजप (BJP) नेत्यांनीही प्रत्यूत्तर देण्यास कंबर कसली आहे. दरम्यान, भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी ‘रझा अकादमी’चा मुद्दा उपस्थित करून महाविकास आघाडीवर (MVA) निशाणा साधला आहे.

नितेश राणे ट्विट करत म्हणाले, ज्या ‘रझा अकादमीने’ आझाद मैदानात अमर जवान स्मृती स्तंभ तोडला व महिला पोलिस भगिनींशी (Ladies Police Constables) गैरवर्तन केले, अशा देशविरोधी कृती करणाऱ्यांच्या इफ्तारमध्ये (Iftar Party) सामिल होऊन त्यांना अधिकृतरित्या प्रोत्साहित करण्याच काम महाविकास आघाडी करत आहे. हे धोरण राबविण्यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव आहे का? असा सवाल राणे यांनी उपस्थित केला आहे.

सामाजिक सलोखा (social harmony) बिघडवण्यामागे आणि उसळलेल्या दंगलीमागे (Riots) रझा अकामदीचा हात असल्याचा आरोप याआधीही भाजपने केला आहे. त्रिपुरात (Tripura) धार्मिक स्थळांची तोडफोड झाल्याची खोटी माहिती समाज माध्यमांवर पसरवून मुस्लिम (Muslim) धर्मियांची माथी भडकविली असल्याचाही आरोप नितेश राणे यांनी केला होता.

दरम्यान, पुन्हा एकदा आझाद मैदानात अमर जवान मुर्ती तोडली व महिला पोलिस भगिनींशी गैरवर्तन केल्याचा मुद्दा उपस्थित करत भाजपाचे नितेश राणे यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here