@maharashtracity
भाजपा आमदार अँड आशिष शेलार यांचे विधानभवन सचिवांना पत्र*
मुंबई: महाराष्ट्र विधानसभेने भाजपाच्या 12 आमदारांचे केलेले एक वर्षांचे निलंबन हे सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) अवैध, घटनाबाह्य व अतार्किक ठरवून रद्द केले असल्याचे विधानभवन सचिवांना पत्र लिहून भाजपा आमदार अँड आशिष शेलार BJP (MLA Ashish Shelar) यांनी अवगत केले आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार यापुढे या आमदारांना विधानभवनात प्रवेश खुला झाला आहे याकडेही शेलार यांनी सचिवांचे लक्ष वेधले आहे.
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात भाजपाच्या 12 आमदारांना एक वर्षांसाठी निलंबित (BJP MLAs suspended) केल्याच्या विरोधात 12 आमदारांतर्फे आमदार अँड आशिष शेलार यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील निकाल 28 जानेवारीला आला असून सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने हे निलंबन अवैध ठरवून रद्द केले आहे.
याबाबत 12 आमदारांच्यावतीने भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी विधानसभा सचिवांना पत्र लिहून या याचिकेत न्यायालयाने दिलेल्या आदेशाची सविस्तर कायदेशीर माहिती सचिवांना अवगत केली असून सोबत निवाड्यांची प्रत ही जोडली आहे.
न्यायालयाने निलंबन रद्द केल्यामुळे यापुढे विधिमंडळाच्या मुंबई (Mumbai Vidhan Bhavan) आणि नागपूर (Nagpur Vidhan Bhavan) येथील विधानभवन परिसरात प्रवेशाचा आमचा मार्ग मोकळा केला आहे, याकडे विधानसभा सचिवालयाचे लक्ष वेधले आहे.