भाजप आमदार गोपीचंद पडळकर
@maharashtracity
मुंबई: भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांनी वंचित घटकाला न्याय मिळावा यासाठी कायदेशीर तरतूद केली. असे असले तरी सत्तेचा माज असलेले काही घटक आमच्यावर अन्याय करतात. यांच्याविरुद्ध आपला लढा जारी ठेवू, असा निर्धार भारतीय जनता पक्षाचे विधान परिषद सदस्य गोपीचंद पडळकर (BJP MLC Gopichand Padalkar) यांनी व्यक्त केला.
ते म्हणाले, आजचा दिवस या देशातील दुर्बल वंचिताना प्रेरणा देणारा आहे. कारण आज परमपुज्य विश्वरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे.
डॉ. बाबासाहेबांनी वंचित घटकांना न्याय मिळाला पाहिजे, प्रस्थापितांकडून होणारे त्यांचे शोषण थांबले पाहिजे, यासाठी भारतीय संविधानात (Indian Constitution) तशी तजविज केली. पण आजही सत्तेचा माज असणारे प्रस्थापित आमचे हक्क आमच्यापर्यंत पोहचू देत नाहीत.
पडळकर पुढे म्हणाले, जेव्हा आम्ही आवाज उठवतो तेव्हा आमच्यावर जीवघेणे हल्ले होतात. आमच्या मेंढपाळांवर हल्ले होतात. वंचित समूहावर अँट्रोसिटीच्या (atrocities) घटनाही वाढल्या आहेत. आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करून आम्हाला दाबले जाते.
तरीही बाबासाहेबांचे स्मरण करून सगळ्या संकटावर मात करत आपल्याला आपला न्याय हक्काचा संघर्ष सुरूच ठेवावा लागेल. तीच खरी बाबासाहेबांना मानवंदना असेल, असे पडळकर म्हणाले.