Twitter : @Rav2Sachin
मुंबई
अच्छे दिन च्या नावाखाली भाजपने कायम धार्मिक ध्रुवीकरण आणि ब्राह्मणवादाला खतपाणी घालण्याचे काम केले आहे, ज्यामुळे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि अल्पसंख्यांक समूहाच्या विरोधात द्वेषातून केले जाणारे गुन्हे (hate-crimes) वाढले आहेत, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
बेलार्ड पिअर येथील वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
The Merchant of Death and Hate ने जातीय संहाराचे (ethnic cleansing) 2002 चे गुजरात नरसंहार मॉडेल, ज्याने भाजपा-आरएसएसला केंद्रात सत्तेत बसवले, तेच मॉडेल ईशान्य भारतात आयात केले आहे, असाही दावा आंबेडकर यांनी केला.
मणिपूरमध्ये सुरू असलेला हिंसाचार बघितला तर लक्षात येते की गुजरात मधील २००२ हिंसाचाराशी बरेच साधर्म्य आहे. जसे की राज्य प्रायोजित हिंसाचार, संघर्ष जास्त काळ सुरू ठेवणे, नरसंहार, महिलांवर बीभत्स अत्याचार करणे, विटंबना करणे इत्यादी असे ते पत्रकार परिषदेत म्हणाले.
द्वेष आणि जातीवादाची जी दुकान आहे आणि त्या व्यापाराचा जो सर्वात मोठा ठेकेदार दिल्लीत बसून स्वत:ला प्रधान सेवक म्हणवतो, त्यांना मी सांगू इच्छितो की 2002 गुजरात हिंसाचार घडल्यावर सोनिया गांधी यांनी तुम्हाला जे नाव दिले होते, ते जाता – जाता खरे करू नका. एक धर्मनिरपेक्ष संघराज्य म्हणून भारताच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह लागल्याचा उल्लेख त्यांनी यावेळी केला.