राज्यमंत्री संजय बनसोडे यांचे संदीप बेडसे यांना आश्वासन
@maharashtracity
मुंबई: धुळे जिल्यातील शिंदखेडा मतदार संघातील शिंदखेडा तालुक्यातील १९ गावे व साक्री तालुक्यातील १५ गावे असे एकूण ३४ गावांच्या पाणीपुरवठा योजनांचे सुधारणात्मक पुर्ण:जोडणीचे (Retrofitting) कामे जल जीवन मिशन अंतर्गत पूर्ण करण्याबाबत कार्यवाही करण्याची ग्वाही पाणी पुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोड (Minister Sanjay Bansod) यांनी दिले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) माजी जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे (Sandeep Bedse) यांनी राज्यमंत्री बनसोड यांची मुंबईत भेट घेऊन या ३४ गावांच्या पाणी पुरवठा योजनेचे कामे जल जीवन मिशन मधून पूर्ण करावे आणि त्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी विनंती केली.
त्यावेळी ना. बनसोडे यांनी अभियान संचालक, जल जीवन मिशन अभियान यांना तात्काळ कार्यवाही करणे बाबतच्या सूचना दिल्यात.
संदीप बेडसे यांनी राज्यमंत्री संजय बनसोड यांच्या निदर्शनास आणून दिले की, शासनाच्या प्रचलित धोरणानुसार जल जीवन मिशन अंतर्गत पूर्वीचा किमान ४० लिटर प्रतिमाणसी प्रतिदिन होत असलेला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा आता किमान ५५ लिटर प्रति माणसी प्रति दिन करण्यात आला आहे. या निकषास अनुसरून शिंदखेडा मतदार संघातील खाली नमूद गावांच्या पाणीपुरवठा योजनांमध्ये सुधारणात्मक पुर्ण: जोडणीची कामे करणे अत्यंत गरजेचे आहे.
गावांमध्ये साठवण टाक्यांची क्षमता वाढविणे, ज्या गावांमध्ये पिण्याचे पाणी कमी पडत असेल तेथे नवीन उद्वभव (Source) घेणे. तसेच गावांतर्गत पाईपलाईन दुरुस्त करणे किंवा नवीन पाईपलाईन टाकने इत्यादी प्रकारचे अनुषांगिक कामे करण्यासाठी खाली नमूद गावांना निधीची आवश्यकता भासणार आहे, अशी मागणी संदीप बेडसे यांनी राज्यमंत्री बनसोड यांच्याकडे केली.
1) अजंदे (बु) – १६.५० लक्ष
2)अमळथे – ६० लक्ष
3)बेटावद – १५ लक्ष
4)दभाशी – २० लक्ष
5)लंघाणे – ५५ लक्ष
6)भिलाणे दिगर – १५ लक्ष
7)मुडावद – ४० लक्ष
8)नवे कोडदे – १५ लक्ष
9)निमगुळ – ६० लक्ष
10)पडावद – ८५ लक्ष
11)रंजाणे – २५ लक्ष
12)साहुर -१० लक्ष
13)सुलवाडे -३० लक्ष
14)चवळदे -१८ लक्ष
15)वालखेडा -५० लक्ष
16)वणी – ४८ लक्ष
17)वरपाडे – २५ लक्ष
18)झोतवाडे – २५ लक्ष
19)आरावे – १८ लक्ष
20)कढरे -२५.५० लक्ष
21) नागपुर (व) – २२ लक्ष
22)ऐचाळे – ३० लक्ष
23)बळसाणे – ४५ लक्ष
24)आमोदे(छा) – ३५ लक्ष
25) दुसाने – ४० लक्ष
26)हट्टी(बु) – ३४ लक्ष
27) हट्टी(खु) – १७५ लक्ष
28)म्हसाळे – २५ लक्ष
29)फोफरे – ४० लक्ष
30)सतमाणे – ३० लक्ष
31)उभरांडी – ४५ लक्ष
32)आयने मळखेडे – ३० लक्ष
33)उभंड दगडी विहीर – ३० लक्ष
34)छावडी – २५ लक्ष
“सुधारणात्मक पुर्ण:जोडीणीच्या कामांमुळे संबंधित गावांमधील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या सुटणार आहे.”
- संदीप बेडसे, माजी जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, धुळे