कार्यालय सुशोभीकरणावर केला दीड कोटींचा खर्च

स्व ‘कल्याण’ करणाऱ्या आयुक्तांना कोणाचे अभय

मुंबई: महाराष्ट्र कामगार (Labour) विभागाचे आयुक्त (Commissioner) डॉ महेंद्र कल्याणकर (Mahendra Kalyankar) यांनी बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स (Bandra-Kurla complex) येथील आयुक्त कार्यालयाच्या सुशोभीकरणावर तब्बल दीड कोटी रुपयांचा खर्च केला आहे. असे करतांना त्यांनी शासनाची पूर्व परवानगी घेतली नव्हती, अशी माहिती मंत्रालयातील वरिष्ठ सूत्रांनी दिली. दरम्यान, कल्याणकर यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले आणि शासनाची परवानगी घेऊन सुशोभीकरण केल्याचे सांगितले.

कल्याणकर यांनी बिकेसीमधील आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारताच सर्वप्रथम कार्यालय सुशोभीकरणाचे काम हाती घेतले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याणकर यांनी शासनाची पूर्व परवानगी न घेता कार्यालय सुशोभीकरणावर सुमारे १ कोटी ५५ लक्ष रुपये खर्च केले आहेत.

यात कल्याणकर यांनी बाह्य भाग, प्रतीक्षा कक्ष आणि अन्य खोल्या आधुनिक पद्धतीने सुशोभित करतांनाच आयुक्त बसतात ते कार्यालय, आतील विशेष कक्ष (anti chamber) याठिकाणी विशेष सुविधा उपलब्ध करून घेतल्या आहेत.

सूत्रांनी संगीतले की कुठलाही अधिकारी किंवा नवीन मंत्री आपापले कार्यालय सुशोभित करून घेतात, पण त्यासाठी त्यांच्या कार्यालय/विभाग प्रमुखाची (सचिव व त्या दर्जाचा अधिकारी) अर्थात शासनाची पूर्व परवानगी घेतल्यानंतरच सर्वाजनिक बांधकाम विभागाकडे काम सोपवले जाते.

कामगार मंत्रालयातील सूत्रांनी दावा केला की कल्याणकर यांनी कुठलीही शासकीय पद्धतीचा अवलंब न करता स्व अधिकारात कार्यालय सुशोभित करून घेतले.

यासंदर्भात कल्याणकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सर्व आरोप आणि दावे फेटालून लावले. “मी शासनाची परवानगी घेऊनच कार्यालय सुशोभीत करून घेतले. त्यावर १ कोटी ५५ लक्ष रुपये नव्हे तर केवळ ६० लक्ष रुपये खर्च केले आहेत,” असे आयुक्त कल्याणकर म्हणाले.

शासनाच्या परवानगी शिवाय कोणतेही काम करता येत नाही, असेही कल्याणकर म्हणाले. ते म्हणाले की कार्यालय सुशोभीकरण सुमारे पाच महिन्यांपूर्वी झाले असून हा जुना विषय आताच का चर्चेला आला, असा प्रश्न उपस्थित करून आश्चर्य व्यक्त केले. कल्याणकर यांच्याकडे औद्योगिक सुरक्षा विभागाचाही अतिरिक्त पदभार आहे. हे पद तांत्रिक असतांना आतांत्रिक असलेल्या कल्याणकर यांच्याकडे हा पदभार का सोपवला गेला, अशा तक्रारी संबंधित विभागाकडून करण्यात येत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here