कोरोना व्हायरसचा संपूर्ण मार्केटवर खोलवर परिणाम झालेला आहे. या आठवड्यातील कृषीव्यतिरिक्त कमोडिटीजवर प्रकाश टाकताना एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे नॉन एग्री कमोडिटीज अँड करन्सीजचे मुख्य विश्लेषक प्रथमेश माल्या यांनी सोन्याच्या किमतीमध्ये वाढीची शक्यता वर्तवली. त्यांनी सांगितले की अमेरिका सरकारने जाहीर केलेल्या मदतीच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात सोन्याच्या किंमती ८ टक्क्यांपेक्षा जास्त वाढल्या. अमेरिकी फेडरलने कोरोना व्हायरसच्या साथीमुळे होणा-या आर्थिक परिणामांना खिळ घालण्यासाठी २ ट्रिलियन डॉलरचे पॅकेज जाहीर केले होते. अमेरिकी डॉलरनेही घसरण घेतली असून धातूंच्या किंमतींना पाठींबा दर्शवला आहे. डॉलरच्या घसरणीमुळे सोन्याच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे या आठवड्यात सोन्याच्या किंमती ४५००० रुपये प्रति १० ग्राम पर्यंत अशी अपेक्षा आहे. 

तांब्याच्या किंमतीबाबत त्यांनी सांगितले की मागील आटवड्यात एलएमईमध्ये धातूंच्या किंमतीत संमिश्र परिणाम दिसून आले. अॅल्युमिनिअमच्या किंमतीत सर्वाधिक घसरण दिसून आली. या आठवड्यात बेस मेटलच्या किंमतींमध्ये आणखी घट होईल आणि तांब्याच्या किंमतीत ३९० प्रति किलोग्रामच्या जवळपास असतील अशी आशा आहे. लॉकडाउननंतर किंमत मिळण्यास वेळ लागेल तसेच अनेक देशांनी आर्थिक गतिविधी टिकवून ठेवण्यासाठी प्रभावी उपाययोजना केल्या असल्याने ही स्थिती सुधारण्याची अपेक्षा आहे.

या आठवड्यातील तेलाच्या किंमतीबाबत बोलताना श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले की, ‘लॉकडाउनचा आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या मागणीला मोठा फटका बसला आहे. यासह अमेरिकेच्या क्रूड यादीची पातळ सलग ९ व्या आठवड्यात १.६ दशलक्ष बॅरलने वाढली. त्यामुळे क्रूडच्या नफ्याला आणखी खिळ बसली. या आठवड्यात तेलाच्या किंमती १६०० अंकांनी घसरतील असा अंदाज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here