@maharashtracity
मुंबई: राज्यात रोजगार निर्मिती (employment generation) आणि त्याच वेळी उद्योजक निर्माण करण्यासाठी आधुनिक प्रशिक्षण आणि योजना आखण्याचे काम सुरु असल्याचे कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी सांगितले. कौशल्य विकास विधेयक (Skill Development Bill) मांडताना ९ सदस्य बोलले. यावेळी प्रशिक्षणातील समस्या आणि गरजा मांडण्यात आल्या.
मलिक यांच्या माहितीप्रमाणे बेरोजगारी दूर करण्यासाठी रोजगार निर्मिती करण्याचे काम सुरु आहे. प्रशिक्षणातील उणिवा शोधून अद्ययावत बदल करण्याचे काम सुरु आहे. यानुसार काही विषयातून पोस्ट ग्रॅज्युएशन प्रशिक्षण देता येऊ शकते का अशी चाचपणी करणार आहे. यातून प्रशिक्षणातील दर्जा वाढविण्याचे काम करणार आहे.
राज्यात शासकीय 605 आयटीआय (ITI) असून यातून कौशल्य विकास भविष्यातील स्किल संकल्पना राबविण्यात येणार आहे. खासगी संस्थेकडून हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. शिवाय विविध महामंडळाकडून रोजगारासाठी इच्छूकांना कर्ज देण्यात येईल असे मलिक म्हणाले.
फक्त रोजगारच नव्हे तर उद्योजक निर्माण करण्याचे काम कौशल्य विकास विभागाकडून सुरु आहे. नव्या रोजगारासाठी डीपी होल्ड सारख्या खासगी कंपनीशी चर्चा सुरु असल्याची माहिती देण्यात आली. शिवाय महत्वाचे म्हणजे प्लेसमेन्ट रिव्हेलटरी ऍक्ट (Placement Revelatory Act) आणण्यात येईल. यातून रोजगार देणाऱ्या कंपन्यांचे मॉनिटरिंग होणार असून बेरोजगारांची फसवणूक होणार नाही.
तसेच खार वांद्रे येथील आयटीआयच्या जागेत फिल्म संबंधित प्रशिक्षण देणारे केंद्र दादासाहेब फाळके (Dadasaheb Phalke) नावाने निर्माण करण्यात येणार आहे. तसेच समूह संस्था, आस्थापनामध्ये दर वर्षी 2 लाख असे 6 लाख रोजगार निर्माण करण्यात येणार आहेत.