@maharashtracity
जागतिक अर्थव्यवस्थांमध्ये मजबूत सुधारणा दिसून येत असल्याने गुंतवणूकदार जोखिमीच्या मालमत्तांकडे वळाले. तसेच वाढत्या मागणीमुळेही क्रूड तेल आणि बेस मेटलने या आठवड्यातील पहिल्या ट्रेडिंगच्या दिवशी तोटा कमावल्यानंतर काहीशी सुधारणा केली. तर सोन्याचे दर काहीसे कमी झाले. तथापि, कमोडिटीच्या वाढत्या दरावर मर्यादा घालण्याचे चीनचे प्रयत्न आणि आशियातील वाढत्या कोव्हिड-१९ रुग्णसंख्येमुळे जागतिक गुंतवणूकदार खबरदारी बाळगून असल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले.
सोने: स्पॉट गोल्डने या आठवड्याची सुरुवात ०.०४ टक्क्यांच्या थोड्या नफ्याने केली. अमेरिकी ट्रेझरी उत्पन्नातील घसरणीमुळे सोन्याचे दर १८८१.१प्रति औसांवर स्थिरावले. नरमाईवरील डॉलर आणि आशियातील वाढत्या कोव्हिड-१९ रुग्णांमुळे सुरक्षित मालमत्ता असलेल्या सोन्याचे आकर्षण कायम आहे.
बिटकॉइन या क्रिप्टोकरन्सीमध्ये नुकतीच घट झाली तसेच संभाव्य चलनवाढीच्या चिंतेनेही सोन्याच्या दरांना आधार मिळत आहे. तथापि, जागतिक अर्थव्यवस्थांमधील वेगवान सुधारणा, जागतिक इक्विटीमधील भरपूर नफा आणि जगभरात वेगाने होणारे लसीकरण यामुळे मार्केटमधील जोखीमीची भूक वाढली. परिणामी पिवळ्या धातूंच्या किंमतीवर काहीसा परिणाम झाला.
कच्चे तेल: सोमवारी डब्ल्यूटीआय क्रूडचे दर ३.८ टक्क्यांनी वाढले आणि ६६.१ डॉलर प्रति बॅरलवर स्थिरावले. अनेक देशांमध्ये जोरदार सुरु असलेली लसीकरण मोहीम आणि इराण अणू करारासंबंधी चर्चांमुळे तेलाच्या दरांना आधार मिळाला. तसेच तेलाच्या मागणीत सुधारणा होण्याचा आशावादही निर्माण झाला. आधीच्या आठवड्यात तेलाने गमावलेले दर या आठवड्यात सुधारले. जागतिक अर्थव्यवस्थेत मोठी सुधारणेंमुळे हे परिणाम दिसले. तसेच इराणी तेल पुरवठ्यास पुन्हा सुरुवातीमुळे अतिरिक्त पुरवठ्याची चिंताही यापुढे कमी झाल्याचे दिसून आले.
अमेरिकेतील नॅशनल हरिकेन सेंटरच्या अहवालात, मेक्सिकोतील आखातात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने वादळ निर्माण होण्याची शक्यता असल्यानेही तेलाच्या दरांना आणखी आधार मिळाला. तथापि, आशियातील वाढत्या कोव्हिड-१९ संक्रमितांमुळे तसेच चीनमधील मागणी कमी होण्याच्या अंदाजामुळे क्रूडमधील नफ्यावर मर्यादा आल्या.
बेस मेटल्स: आठवड्यातील पहिल्या ट्रेडिंगच्या दिवशी एलएमईवरील औद्योगिक धातूने संमिश्र स्थिती दर्शवली. तर या समूहात निकेलने सर्वाधिक नफा कमावला. अमेरिकी डॉलर कमकुवत झाल्याने तसेच अनेक अर्थव्यवस्थांवरील निर्बंध कमी होत असल्याने औद्योगिक धातूंना आवश्यक मागणी येईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. तथापि, कमोडिटीजच्या वाढत्या दरांवर मर्यादा आणण्याच्या चीनच्या हालचालींमुळे जगातिक गुंतवणूकदार चिंतेत आहेत. चिनी नियामकांनी त्यांच्या कमोडिटी मार्केटवर निरीक्षण ठेवणे, फ्यूचर आणि स्पॉट मार्केटमधील फेरतपासणी, अनियमितता आणि द्वेषपूर्ण अनुमानांना प्रतिबंधीत करण्याचे वचन दिले आहे.